06 December 2020

News Flash

करोनारुपी रावणाचा नाश करुया-उद्धव ठाकरे

महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट करेल असाही व्यक्त केला विश्वास

संग्रहित (PTI)

विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा. यंदाच्या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करुन विजय खेचून विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेऊ. आपण एकजुटीने करोनारुपी रावणाचा नाश करुया असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. करोना संकटावर मात करुन महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल असाही विश्वास दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. तसंच महाराष्ट्राच्या जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

लढवय्या महाराष्ट्र ही आपल्या राज्याची ओळख आहे. आपण अनेकदा संकटांचा यशस्वीपणे सामना केला आहे. त्यामुळे करोना विषाणू विरोधातल्या लढ्यातही आपण सर्व भेद बाजूला ठेवून एकवटलो आहोत. करोनाच्या संकटात निसर्गाचीही अवकृपा झाली. पण या सगळ्या संकटांना न डगमगता आपण सामोरे जात आहोत. करोना विषाणूला पराजित करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबवत आहोत. घराघरापर्यंत पोहचून करोना विषाणूचा पाठलाग करुन त्याला रोखण्यासाठी करोना योद्धे काम करत आहेत असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सगळ्यांनी खूपच संयम दाखवला आहे. सर्व धर्मीयांनी आपले सण आणि उत्सव घरीच साजरे केले. विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण आपण साजरा करणार आहोत. दसरा हा सण संकटांवर, वाईट प्रवृत्तींवर मात करण्यासाठी सीम्मोलंघन करुन विजय खेचून आणण्याची प्रेरणा देतो असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आपण दसरा उत्साहात साजरा करत असतानाच करोना विषाणूच्या समूळ उच्चाटनासाठी आरोग्य दक्षतेचे, गर्दी न करण्याचे, शारिरीक अंतर राखण्याचे, मास्क वापरण्याचे, वारंवार हात धुण्याच्या सूचनेचे पालन करावे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 8:53 pm

Web Title: cm uddhav thackeray gives wishes of dussehra to people of maharashtra scj 81
टॅग Uddhav Thackeray
Next Stories
1 गुड न्यूज! महाराष्ट्रात आत्तापर्यंत १४ लाख ५५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त 
2 सोलापुरात झेंडू फुलांना प्रति किलो १५० रुपयांचा भाव
3 “पूर, करोना आणि तांत्रिक अडचणींमुळे अंतिम वर्षांची परीक्षा न देता आलेल्यांना १० नोव्हेंबरपूर्वी पुन्हा संधी”
Just Now!
X