मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोणावळा जवळील कार्ला येथील एकविरा देवीचं दर्शन घेतलं आहे. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि चिरंजीव तसंच आमदार आदित्य ठाकरेही उपस्थित होते. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच एकविरा देवीच्या दर्शनाला पोहोचले. एकविरा देवी ठाकरे कुटुंबाची कुलदैवत आहे. अनेकदा ठाकरे कुटुंब एकविरा देवीच्या दर्शनाला येत असतं.

एकविरा देवीचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे शिवनेरी गडावर जाणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा आहे. किल्ले शिवनेरीवरून उद्धव ठाकरे सरसकट शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यावर मी स्वत: शिवनेरीवर जाणार, शिवाय कुलदैवत एकवीरेचंही दर्शन घेणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं होतं.

Sunetra pawar, Ajit Pawar,
अजित पवारांनी सपत्निक घेतले दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन; सुनेत्रा यांनी देवाला केली ‘ही’ प्रार्थना
Udayanraje bhosle show of power tomorrow in Satara
उदयनराजेंचे उद्या गुरुवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन
Thackeray Group Criticizes shinde group as devendra fadnvis announced shrikant shinde Candidature for Kalyan Lok Sabha
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाची उमेदवारी जाहीर केल्याने ठाकरे गटाची शिंदेवर टीका
kalyan lok sabha marathi news, vaishali darekar latest news in marathi
वैशाली दरेकर : उत्तम वक्त्या आणि आक्रमक चेहरा, कल्याणमध्ये ठाकरे गटाकडून महिला उमेदवार रिंगणात

छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असणाऱ्या शिवनेरी गडावरुन उद्धव ठाकरे सरसकट शेतकरी कर्जमाफीची घोषणा करु शकतात असे संकेत आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाचा दौरा आहे.

पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना लवकरच भरीव मदत देणार असल्याचं जाहीर केलं होतं. शेतकऱ्यांना तुटपुंजी नाही तर लवकरच भरीव मदत करण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार असून त्यासाठी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या योजना व त्यांच्या अंमलबजावणीचा वास्तववादी लेखाजोखा मंत्रिमंडळासमोर सादर करण्याची सूचना प्रशासनाला करण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर जाहीर केले होते.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसप्रणित महाविकास आघाडीच्या महत्त्वाकांक्षी सरसकट शेतकरी कर्जमाफीसाठी सुमारे ६० हजार कोटी रुपयांहून अधिक निधी लागणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारलाही हा निधी कर्जरूपानेच उभारावा लागणार असल्याने सुमारे पावणेपाच लाख कोटी रुपये कर्जाचा बोजा मोठय़ा प्रमाणावर वाढणार आहे.