News Flash

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा रविवारचा रायगड दौरा रद्द

दौरा पुढे ढकलला

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. (संग्रहित छायाचित्र)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नियोजित रायगड दौरा रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्या (१४ जून) निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार होते. त्यांच्या हस्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना मदत साहित्याचं वाटप करण्यात येणार होतं. मात्र, अचानक हा दौरा रद्द करण्यात आला आहे. मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलेला आहे. त्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (१४ जून) एक दिवसाच्या रायगड दौऱ्यावर जाणार होते. मात्र, अचानक हा नियोजित दौरा सायंकाळी रद्द करण्यात आला. रविवारी चौल, बोर्ली, मुरुड येथे चक्रीवादळग्रस्तांना मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते मदत साहित्य आणि अनुदान वाटप केले जाणार होते. त्याचबरोबर चौल येथे जाऊन आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेण्याचेही मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात नियोजित होते. ११ वाजता चौल मधील घरे, पिके नुकसानीची पाहणी करून नंतर त्यांच्या हस्ते सानुग्रह अनुदान, सौर कंदिल, इतर साहित्याचे वाटप करण्यात होते. त्यानंतर बोर्ली आणि मुरुड येथे नुकसानीची पाहणी आणि मदत वाटप करण्याचे नियोजित होते. उद्या (१४ जून) रायगड आणि कोकण पट्ट्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. त्यापार्श्वभूमीवर हा दौरा रद्द करण्यात आल्याचं वृत्त आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्यामुळे निसर्ग चक्रीवादळ निर्माण झालं होतं. या चक्रीवादळाचा रायगड, रत्नागिरीसह सिंधुदूर्ग जिल्ह्यातील काही भागाला मोठा फटका बसला. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दौरा केला होता. तसेच मदत निधीही जाहीर केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा हा कोकणातील सलग दुसरा दौरा होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 11:08 pm

Web Title: cm uddhav thackeray raigadh tour cancel bmh 90
Next Stories
1 “सरकारच्या बेशिस्तपणामुळे करोना वाढला”; रामदास आठवले यांचा आरोप
2 “अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत या मताचा मी आहे, पण…”; रामदास आठवले यांनी मांडली भूमिका
3 सोलापुरात चिंता वाढवणारी परिस्थिती; एकाच दिवशी नऊ जणांचा मृत्यू
Just Now!
X