सध्या राज्यातील करोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. असं असलं तरी करोनाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळला नाही. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात नाईट कर्फ्यू लागू करण्याबबात आणि राज्यात पुन्हा लॉकडाउन लागू करायचा अथवा नाही यावर भाष्य केलं.

“युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये आता पुन्हा एकदा कडक लॉकडाउन लागू करण्यात आलं आहे. गर्दी टाळण्यासाठी त्यांनी लॉकडाउन लागू केलंय. पण करोनानं त्या ठिकाणी आपलं रूप बदलल्याची माहिती माझ्या समोर आली आहे. नवा विषाणू हा करोनापेक्षा अधिक झपाट्यानं पसरतोय. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी अनेकदा गर्दी होत असते. परंतु त्या ठिकाणी आता पुन्हा लॉकडाउन लागू करण्यात आलं आहे. त्यांच्याकडून आपल्यालाही काही गोष्टी शिकणं आवश्यक आहे. अनेकांनी मला सांगितलं की ज्या चाचण्या करताय त्या आता कमी करा. जे सुरूवातीच्या काळात झालं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून चाचण्या करतोय. बाहेरून येणाऱ्या लोकांना जर संसर्ग झाला असेल तर त्यांच्यामुळे आपल्याला पुन्हा राज्यात संसर्ग वाढू द्यायचा नाहीये. पुन्हा लॉकडाउन नाईट कर्फ्यू करण्याची गरज नाही असं मला वाटतं. आपण अनुभवातून शिकलोय,” असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

“सुरूवातीला आपल्या भेटीच्या वेगाची वारंवारता जास्त होती. आता एकंदरीत परिस्थिती जगासमोर आहे. सर्वांना सरकारनं जे काही सांगितलं तरी ते अंमलात आणलंय. म्हणूनच करोनावर आपल्याला नियंत्रण मिळवलं. आता राज्यात सर्वकाही सुरू झालंय. मात्र कुटुंबप्रमुख म्हणून सावध राहा सांगणं हे माझं कर्तव्य आहे,” असंही ते म्हणाले. “गेल्या मार्च महिन्यापासून राज्यात करोनाचे रुग्ण दिसालया लागले होते. ते वाढ कशी झाली, रुग्णांची संख्या कमी कशी झाली हे आपण जगासमोर पारदर्शकपणे मांडलं. उन्हाळा आणि पावसाळ्यात कोविड व्यतिरिक्त साथींना आपण प्रतिबंध घालू शकलो. आपल्याकडे लॉकडाउन होता, मास्क लावत होतो, अंतर ठेवत होतो. आता रहदारी वाढल्यानं थंडीचे आजार दिसतायत. त्यावरही मास्क, सुरक्षित अंतर ठेवणं करावं लागणार आहे. करोनाची लस कधी येणार याची अजुन माहिती नाही. मास्क लावणं पुढील सहा महिनेतरी बंधकारक असणार आहे, असंच दिसत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

“युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये आता पुन्हा एकदा कडक लॉकडाउन लागू करण्यात आलं आहे. गर्दी टाळण्यासाठी त्यांनी लॉकडाउन लागू केलंय. पण करोनानं त्या ठिकाणी आपलं रूप बदलल्याची माहिती माझ्या समोर आली आहे. नवा विषाणू झपाट्यानं पसरतोय. त्यांच्याकडून आपल्यालाही काही गोष्टी शिकणं आवश्यक आहे. अनेक जण आता मास्क लावून फिरतायत. काळजी घेतायत. परंतु काही लोकं हे काळजी घेत नाहीयेत. परंतु त्यांच्यामुळे इतरांना धोका निर्माण झाला नाही पाहिजे याची काळजी घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी येताना जाताना मास्क हे शस्त्र आहे हे लक्ष ठेवा, नव्या वर्षाचं स्वागत करतना सावध राहा. आता लग्नसराई सुरू झाली आहे. त्यात कुटुंबीयांना आमंत्रण द्या पण करोनाला देऊ नका याची काळजी घ्या. सावधानता बाळगणं आवश्यक आहे,” असंही मुख्यमंत्री म्हणाले.