24 September 2020

News Flash

“हल्ली विरोधी पक्षनेतेपदाचे दिवस धूमधडक्यात साजरे होत आहेत”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

हल्ली विरोधी पक्षनेते पदाचे दिवसच धूमधडाक्यात साजरे होत आहेत असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. एक महिना झाला, शंभर दिवस पूर्ण झाले की सरकारचे वाढदिवस साजरे केले जातात. मात्र सध्या उत्सवावर बंदी आहे. हल्ली विरोधी पक्षनेते पदाचेच दिवस धूमधडाक्यात साजरे होतात असं दिसतं आहे. असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी हा टोला लगावला.

आणखी वाचा- करोनासोबत जगणं प्रत्येकाने शिकलंच पाहिजे- उद्धव ठाकरे

“एक महिना पूर्ण झाला, १०० दिवस झाले, सहा महिने झाले असे सरकारचे वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरे करण्यात आले. आता मला वाटतं आहे की विरोधी पक्षनेते पदाचे दिवसच धूमधडाक्यात साजरे केले जात आहेत.”

आणखी वाचा- … त्यासाठी मी म्हणजे काही ट्रम्प नाही : उद्धव ठाकरे

आणखी वाचा- महाराष्ट्राच्या जनतेने दाखवलेला विश्वास हेच माझं बळ- उद्धव ठाकरे

सरकारचे सहा महिने कसे गेले यावरही उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. “जे काही सहा महिने या सरकारचे गेले, ते सहा महिने विविध आव्हानं घेऊन आले होते आणि आव्हानं अजूनही संपलेली नाहीत. राजकीय आव्हान ठीक आहे, जनतेचा आशीर्वाद, बळ जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत मला त्या आव्हानाचं काही वाटत नाही. मी राजकीय आव्हानाची पर्वाही करत नाही. पण करोना संकटाचा आकार-ऊकार किंवा नेमकेपण अजूनही आपण ओळखू शकलो नाहीत, असं संकट आलं. आपत्ती येणं काही नवं नाही, पूर येतो, वादळ येतं, सुनामीसारखं संकट येतं जे एका क्षणात होत्याचं नव्हतं करुन जातं. करोनाचं संकट हे या सगळ्यापलिकडचं आहे. आपण जर काळजी घेतली नाही तर झपाट्याने लोक आजारी पडू शकतात आणि मृत्यूही होऊ शकतात. भूकंप, वादळ यांसारखी संकटं येऊन गेल्यानंतर आपल्याला समजतं की नेमकं किती नुकसान झालं आहे. पण करोनाचं संकट आहे ते संपणार कधी कळत नाही. असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2020 9:22 am

Web Title: cm uddhav thackeray taunts devendra fadanvis in saamna interview scj 81
टॅग Uddhav Thackeray
Next Stories
1 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, “ग्रामीण भागांमध्ये पावसाळ्यात करोना केंद्र सुरु करायची असतील तर…”
2 करोनासोबत जगणं प्रत्येकाने शिकलंच पाहिजे- उद्धव ठाकरे
3 उद्धव ठाकरेंनी सांगितलं करोना काळामध्ये मंत्रालयात न जाण्याचं कारण, म्हणाले…
Just Now!
X