20 October 2020

News Flash

…म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले सलमान खानचे आभार

जाणून घ्या, मुख्यमंत्र्यांनी का मानले आभार

सध्या देशातील प्रत्येक जनता कठीण प्रसंगाला सामोरी जात आहे. करोना विषाणूचं सावट असल्यामुळे एकीकडे नागरिकांच्या मनात भीती आहे. तर दुसरीकडे लॉकडाउन असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. परंतु या काळात देशातील जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रातली कर्मचारी जीवाची परवा न करता काम करत आहेत. त्यामुळे अभिनेता सलामान खानने मुंबई पोलिसांमध्ये सॅनिटायझरचं वाटप केलं. त्याचा हा स्तुत्य उपक्रम पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले आहेत.

करोनाला हरवायचं असेल तर शारीरिक स्वच्छता बाळगणं गरजेचं आहे, हे साऱ्यांनाच ठावूक आहे. हात स्वच्छ ठेवणं हे या काळात अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे या काळात प्रत्येक जण सॅनिटायझर विकत घेण्यावर जोर देत आहे. एकाच वेळी सॅनिटायझरची मागणी वाढल्यामुळे बाजारात त्याच्या किंमतीही कमालीच्या वाढल्या आहेत. त्यामुळे सलमान खानने त्याच्या ‘फ्रेश’ (FRSH) या कंपनीत तयार करण्यात आलेले जवळपास १ लाख सॅनिटायझर पोलिसांमध्ये वाटले. त्याची ही कामगिरी पाहून मुख्यमंत्र्यांनी त्याचे आभार मानत ‘या कौतुकास्पद पुढाकारासाठी आपले आभार मानतो’, असं म्हटलं आहे.

दरम्यान, सलमान खानने अलिकडेच ‘फ्रेश’ (FRSH) नावाची एक कंपनी सुरु केली असून या कंपनीत तयार झालेले १ लाख सॅनिटायझर त्याने मुंबई पोलिसांना भेट म्हणून दिले आहेत. लॉकडाउनच्या काळात घरी राहून सलमानने ही नवीन कंपनी सुरु केली आहे. या कंपनीमध्ये बॉडी स्प्रे, परफ्युम, साबण आणि सौंदर्य प्रसाधने यांची निर्मिती केली जाणार आहे. दरम्यान, सलमानच्या फ्रेश या ब्रॅण्डचे प्रोडक्ट्स लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. मात्र सध्याची परिस्थिती पाहता सॅनिटायझरची सर्वाधिक गरज असल्यामुळे फ्रेश सॅनिटायझर बाजारात उपलब्ध झालं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 8:29 am

Web Title: cm uddhav thackeray thanks to salman khan new brand frsh providing 1lakh hand sanitizers mumbai police ssj 93
टॅग Coronavirus
Next Stories
1 या मालिकेने तेजस्विनीच्या पाठीवर दिली आयुष्यभराची खूण; शूटिंगदरम्यानचा ‘तो’ किस्सा
2 “हे घर नाही तर स्वर्ग”; कंगनाने बहिणीसाठी तयार केलं आलिशान घर
3 करोनासाठी शाहरुखच्या ऑफिसचा वापर, रुग्णांचं केलं विलगीकरण
Just Now!
X