27 February 2021

News Flash

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी मुख्यमंत्री आज राज्यपालांना सुपूर्द करणार

राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

विधानपरिषदेसाठी १२ जागांसाठी उमेदवारांच्या नावांची शिफारस महाविकासआघाडीकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली जाणार आहे. यादी आज, सोमवारी (२ नोव्हेंबर ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुपूर्द करणार आहेत. बंद लिफाफ्यात कोणती नावं आहेत? त्याचबरोबर राज्यपाल महाविकास आघाडी सरकारच्या नावांना मंजुरी देणार की आडकाठी करणार यावर सर्वांचं लक्ष आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगावमध्ये बोलताना विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी बारा नावे ठरल्याची माहिती दिली. मात्र, ही नावे गुपित आहेत ती फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच माहिती आहेत. योग्यवेळी ती नावे आम्ही जाहीर करण्यात येणार असल्याचं अनिल देशमुख म्हणाले.

राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात झालेल्या संघर्षानंतर राज्यपाल या नावांना पसंती देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांचं नाव असणार का याबाबत देखील राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु आहे. मात्र अद्याप खडसेंचं नाव निश्चित झालं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अंतिम क्षणी खडसेंचं नाव येणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. उर्मिला मातोंडकर, रेणुका शहाणे आणि शरद पोंक्षे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मात्र बंद लिफाफ्यात कोणती १२ नावं आहेत ते लवकरच उघड होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2020 8:44 am

Web Title: cm uddhav thackeray to submit list of 12 legislative council candidates bhagat singh koshyari nck 90
Next Stories
1 सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत; शिवसेनेनं उपमुख्यमंत्र्यांना खडसावलं
2 भविष्यात सर्वत्र काँग्रेसचा झेंडा फडकणार
3 संत्र्याचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल
Just Now!
X