महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८.३० वाजता फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. ते काय बोलतात? याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. आज लॉकडाउन ४.० चा शेवटचा दिवस आहे. लॉकडाउन ४.० संपण्याआधी राज्य सरकारने नवीन मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत.

काही प्रमाणात निर्बंधांमधून सवलती दिल्या आहेत. ‘मिशन बिगीन अगेन’ या धोरणातंर्गत अनलॉकचा नवीन प्लान सादर केला आहे. ३० जूनपर्यंत राज्यात लॉकडाउन कायम राहणार असला तरी तीन टप्प्यांत वेगवेगळया गोष्टी सुरू होणार आहेत.

मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा सुरु करण्याचा निर्णय झालेला नाही. हॉटेल, मॉल्सही बंद राहणार आहेत. त्यासंबंधी उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.