28 October 2020

News Flash

पूरग्रस्त सांगवीची आज ठाकरे पाहणी करणार

या गावांमध्ये अतिवृष्टीसह बोरी नदीच्या पुरामुळे होत्याचे नव्हते झाले आहे.

सांगवी  गावातील पडझड झालेले घर.

सोलापूर :  पावसाचा जोरदार फटका बसलेल्या  सांगवी गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे. उद्या, सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे याच गावाला भेट देऊ न नुकसानीची पाहणी करणार आहेत.

अक्कलकोट शहर आणि तालुक्यात अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. तालुक्यात सांगवी, रामपूर, शिरशी व अन्य गावांमध्ये झालेले नुकसान प्रचंड आहे. उद्या, सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे याच भागाची पाहणी करणार आहेत. या गावांमध्ये अतिवृष्टीसह बोरी नदीच्या पुरामुळे होत्याचे नव्हते झाले आहे.

अक्कलकोट तालुक्यात १४ ऑक्टोबर रोजी रात्रभर अतिवृष्टी झाली. त्याचवेळी जवळच असलेल्या कुरनूर धरणातील पाणीसाठा वाढल्यामुळे तेथून बोरी नदीत पाणी सोडणे भाग पडले. त्यामुळे सांगवीसह इतर अनेक गावांवर संकट कोसळले. शेतशिवार पाण्याखाली येऊ न शेतांना तळ्यांचे स्वरूप आले. ऊ स, सोयाबीन आदी पिके पाण्याखाली गेली आहेत.

कुरनुर धरणातून सांगवी येथील बोरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने सांगवी गावातील अनेक घरे पाण्याखाली गेली. काही घरांची पडछड होऊ न नुकसान झाले. गावकऱ्यांनी अंगावरील कपडय़ानिशी घरातून सुरक्षितस्थळी हलवले.  घरातील सर्व वस्तूंचे नुकसान झाले. हिंदू व मुस्लीम स्मशानभूमीलाही अतिवृष्टी व पुराचा तडाखा बसला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2020 12:05 am

Web Title: cm uddhav thackeray will visit flood affected sangvi village to inspect the damage zws 70
Next Stories
1 वडेट्टीवार यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणाबाजी
2 “आम्हाला खात्री आहे एकनाथ खडसे भाजपा सोबत राहतील”
3 राज्यात दिवसभरात ११ हजार २०४ जण करोनामुक्त, १५० रुग्णांचा मृत्यू
Just Now!
X