24 September 2020

News Flash

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मेहुणीच्या कारला भीषण अपघात

एकाचा मृत्यू तर तीनजण गंभीर जखमी

शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनानंतर परतताना झालेल्या भीषण कार अपघातात अमृता श्रृंगारपुरे यांच्यासह तीनजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालायात उपचार सुरू आहेत. तर अन्य एकाचा यामध्ये मृत्यू झाला आहे.

पांगरी गावाजवळून जात असताना चालकलास डुलकी लागल्याने कार एका छोट्या पुलावरून खाली कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताची माहिती मिळताच सिन्नर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, जखमींना तातडीने नाशिकमधील अपोलो रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची देखील माहिती मिळाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 7:37 am

Web Title: cm uddhav thackerays relatives injured in car accident msr 87
Next Stories
1 ‘चायनीज’ मांजामुळे चिमुकल्याचा मृत्यू
2 मूकबधिर ‘वर्षां’चे कन्यादान गृहमंत्री करणार
3 मोहिते-पाटील अन् राष्ट्रवादीत कुरघोडीचे राजकारण
Just Now!
X