News Flash

Coronavirus: थेट निधी खर्च करण्यास सहकारी संस्थांना मुभा

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  कोणाच्याही परवानगीशिवाय आपल्या नफ्यातील २० टक्के  निधी खर्च करण्यास सहकारी संस्थांना परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार या संस्थांना आपल्या भागातील करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी मदत करताना मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठीही मदत करता येईल, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी शुक्रवारी दिली.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना बरोबरच उद्योग -व्यवसायात काम करणारे कामगार, गरजू नागरिक यांची भोजन, राहण्याची व्यवस्था केली जाते आहे. या लढ्यासाठी सर्वच संस्था मदत करीत आहेत. सहकारी संस्थांना मात्र  कायद्यातील तरतुदीनुसार सार्वजनिक प्रयोजनासाठी अंशदान देण्यासाठी  राज्य सहकारी संघ या संघीय संस्थेची मान्यता घ्यावी लागते.

राज्यात ३१ जिल्हा बँका,४७५ नागरी सहकारी बँका,१३ हजार ५९९ पतसंस्था, सात हजार कर्मचारी पतसंस्था, २१ हजार विविध कार्यकारी संस्था, २०० साखर कारखाने आणि ६७ दूध संघ  असून या संस्थांना त्यांच्या मागील वर्षातील नफ्याच्या २० टक्के  रक्कम अंशदान किंवा मदतकार्यासाठी राज्य संघाच्या परवानगीने  खर्च करता येते. मात्र टाळेबंदीमुळे अशी परवानगी घेण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन या सर्व संस्थांना कोणाच्याही परवानगीशिवाय ही मदत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अनेक नैसर्गिक आपत्तीप्रसंगी राज्यातील सहकारी संस्थांनी नेहमीच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आर्थिक मदतीसाठी हात पुढे केला आहे. याचप्रमाणे यावेळीही सहकारी संस्थानी मदत करावी  असे आवाहन सहकार मंत्र्यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 10:01 pm

Web Title: co operative institutions need not take permission for their expenses related to corona scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पोलीस उपनिरीक्षकाची गोळ्या झाडून घेत आत्महत्या
2 टाळेबंदीत अन्नधान्य वितरण करणाऱ्या, अन्नछत्र चालविणाऱ्या संस्थांना अल्पदरात अन्न धान्य
3 Coronavirus : वसई-विरारमध्ये ३६ तर, मिरा-भाईंदरमध्ये ३२ रुग्ण
Just Now!
X