News Flash

सागरी सुरक्षेला प्राधान्य देणार – अनिल पारस्कर

रायगड जिल्हय़ाला २१० किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे.

रायगड जिल्ह्य़ातील सागरी सुरक्षेला प्राधान्य देणार, असे रायगडचे नवे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर  यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सुवेझ हक यांची रायगड येथून पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदावर बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी रविवारी अलिबागेत पत्रकारांशी संवाद साधला.   मी यापूर्वी बीड, वर्धा या दोन जिल्ह्य़ांमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. तिथल्यापेक्षा रायगडमधील परिस्थिती वेगळी आहे. रायगड जिल्हय़ाला २१० किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे मी सागरी सुरक्षेला प्राधान्य देणार आहे. म्हणून या जिल्ह्य़ात रुजू होताच मी सागरी पोलीस ठाण्यांना भेट दिली. सागरी सुरक्षेच्या संदर्भात माहिती घेत आहे. या पूर्वीच्या पोलीस अधीक्षकांनी चांगले काम केले आहे. दोन टप्प्यांतील कामे झाली आहेत. तिसऱ्या टप्प्यातील कामे मी पूर्ण करणार आहे. तांत्रिक कर्मचारी भरती करण्याची परवानगी शासनाकडून मिळवणार आहे, असे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या निवसस्थानांचा प्रश्न मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न आहे. रायगड जिल्ह्य़ात सामाजिक बहिष्काराची प्रकरणे होत असतात. यावर कायदेशीर बाबी तपासून कारवाई केली जाईल. रायगडची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी आपल्या विभागातील कर्मचारी दरोडय़ाच्या गुन्ह्य़ात अटक झाले आहेत, या गुन्ह्य़ाच्या प्रकरणात प्रशासन स्तरावर आपण योग्य ती कारवाई करू, असेही त्यांनी सांगितले. कायदा आणि सुव्यवस्था राखताना लोकांच्या समस्या सोडवून लोकाभिमुख पोलीस प्रशासन ठेवण्याचा आपला प्रयत्न राहील. मागील पोलीस अधीक्षकांनी चांगले उपक्रम राबविले आहेत, तेही आपण चालू ठेवणार आहोत, असे पारस्कर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 2:23 am

Web Title: coastal safety issue
Next Stories
1 स्वातंत्र्यानंतरही आंबोली, चौकुळ, गेळेचा प्रश्न प्रलंबित
2 उत्पादन शुल्क खात्याची यंत्रणा ‘मोजमापात गर्क’
3 येवल्यात चिमुरडीचा अपघात, प्रकृती चिंताजनक
Just Now!
X