News Flash

नारळ काढणाऱ्यांना आता ‘नारळमित्र’ संबोधणार

नारळीच्या झाडावर चढून नारळ काढणाऱ्या पाडकरी-माडकरींना आता केंद्रीय नारळ बोर्डाने ‘नारळमित्र’ या नावाने संबोधण्याचे स्पष्ट केले आहे. त्यांना प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षण खर्च दिला जात होता,

| April 26, 2013 04:29 am

नारळीच्या झाडावर चढून नारळ काढणाऱ्या पाडकरी-माडकरींना आता केंद्रीय नारळ बोर्डाने ‘नारळमित्र’ या नावाने संबोधण्याचे स्पष्ट केले आहे. त्यांना प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षण खर्च दिला जात होता, तो रद्द करण्यात आल्याची माहिती केंद्रीय उपाध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी दिली. केंद्रीय नारळ विकास बोर्डाचे उपाध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी नारळ क्षेत्र वाढविण्यासाठी राज्यात या बोर्डाच्या माध्यमातून चळवळ सुरू केल्यानंतर नारळ काढण्यासाठी प्रशिक्षण दिले जायचे. हे प्रशिक्षण सहा दिवस दिले जायचे. या प्रशिक्षण कालावधीत प्रत्येकी १५० रुपयांप्रमाणे ९०० रुपये प्रशिक्षण खर्चही दिला जायचा. हा खर्च आता बंद करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे, असे राजाभाऊ लिमये म्हणाले.
मात्र नारळ काढणे प्रशिक्षण देण्याची सुविधा कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात आली असून प्रशिक्षण कालावधीत निवास व भोजन व्यवस्थेचा खर्च करण्यात येणार आहे, याची नोंद नारळ बागायतदार संघांनी घ्यावी असे आवाहन राजाभाऊ लिमये यांनी केले.
नारळ प्रशिक्षण वर्गात येणाऱ्यांना सीडी व प्रमाणपत्र दिले जाईल, असे लिमये म्हणाले. नारळ काढणाऱ्यांना पाडकरी किंवा माडकरी असे त्या त्या भागात ओळखले जायचे, पण आता केंद्रीय नारळ बोर्डाने ‘नारळमित्र’ असे नामकरण केले आहे. नारळमित्राच्या ओळखीसाठी खास लोगो बनविण्याचा विचार असून नजीकच्या कालावधीत तसे प्रयत्न करण्यात येतील, असे लिमये म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2013 4:29 am

Web Title: coconut friend will be addressed who take down coconut from tree
Next Stories
1 मुरुड नगर परिषद शिक्षण मंडळ सभापतिपदी प्रकाश सरपाटील यांची निवड
2 सतार व तबल्याच्या जुगलबंदीला नाशिककरांची दाद
3 जिल्हा रुग्णालयात मिळणार सायंकालीन बाह्य़रुग्ण सेवा
Just Now!
X