News Flash

सांगली, मिरज शहरात ईदनिमित्त सामूहिक नमाज

सांगली व मिरज शहरासह जिल्ह्यात आज रमजान ईद मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. हजारो मुस्लिम बांधवानी सकाळी इदगाह मदानावर ईदची नमाज अदा केली.

| July 19, 2015 02:10 am

सांगली व मिरज शहरासह जिल्ह्यात आज रमजान ईद मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. हजारो मुस्लिम बांधवानी सकाळी इदगाह मदानावर ईदची नमाज अदा केली. मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देण्यासाठी अनेक राजकीय कार्यकत्रे व पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी मोठय़ा संख्येने इदगाह मदानावर जमले होते.
मिरज आणि सांगली शहरात ईदगाह मदानावर ईदची नमाज अदा करण्यासाठी हजारो मुस्लिम बांधव जमले होते. याशिवाय ठिकठिकाणी असलेल्या मशिदीतही आज ईदची नमाज अदा करण्यात आली. सांगलीतील ईदगाह मदानावर शुभेच्छा देण्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, मुन्ना कुरणे, हारूण शिकलगार, अजित ढोले यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते.
तसेच मिरजेच्या ईदगाह मदानावरही मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी प्रशासकीय व पोलीस अधिकारी उपस्थित होते. यामध्ये पोलीस अधीक्षक सुनील फुलारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील, उप अधीक्षक बजरंग बनसोडे, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार किशोर घाडगे, पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की आदींसह माजी आ. हाफिज धत्तुरे, अय्याज नायकवडी, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष जैलाब शेख, जनसुराज्य शक्तीचे सुमित कदम उपस्थित होते.
आज दिवसभर शहरात िहदू-मुस्लिम बांधव एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत होते. याचबरोबर मुस्लिम बांधव िहदूंच्या घरी खीरकुम्र्याचे डबे पोहोचवत होते. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात पोलीस बंदोबस्त मोठय़ा प्रमाणावर तनात करण्यात आला होता.
कोल्हापुरात रमजान ईद उत्साहात
प्रतिनिधी, कोल्हापूर
करवीर नगरीत शनिवारी रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बोर्डिगच्या ऐतिहासिक पटांगणावर सकाळी परंपरागत पध्दतीने सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. मुस्लिम बांधवांनी परस्परांना अिलगण देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातही सर्वत्र ईद साजरी करण्यात आली.
गेली महिनाभर रमजान महिन्यानिमित्त मुस्लिम बांधव रोजा करीत होते. शुक्रवारी रात्री हिलाल समितीची (चाँद समिती) बठक मौलाना मन्सुरआलम कास्मी यांच्या अध्यक्षतेखाली होऊन चंद्रदर्शनाची साक्ष मिळाल्याने शनिवारी रमजान ईद साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार आज शहरातील विविध मशिदीमध्ये नमाजपठण करण्यात आले. तर दसरा चौकातील मुस्लिम बोìडगच्या ऐतिहासिक पटांगणावर सकाळी ९.३० वाजता मुफ्ती इर्शाद कन्नुरे यांनी पहिल्या जमातीचे नमाज व खुदवा पठण केले. याप्रसंगी मौलाना अब्दुलसलाम कास्मी, मौलाना बशीर नायकवडी, अब्दुलरजाक नायकवडी मुफ्ती ताहिर बागवान यांच्यासह शहर व उपनगरातील सर्व मश्जिदींचे पेश इमाम, मुस्लिम बोìडगचे अध्यक्ष गणी अजरेकर सर्व पदाधिकारी उपस्थित हाते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा, पोलीस उपअधीक्षक राणे, भाजप शहराध्यक्ष महेश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू लाटकर, कुमार काळे आदी राजकीय क्षेत्रातील प्रमुखांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी अिलगण देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी अन्य धर्मीयांना स्नेहभोजनासाठी निमंत्रित केले होते.
इचलकरंजीत ईद शांततेत
इचलकरंजी येथे जवाहरनगर भागात झेंडा लावण्याच्या कारणातून दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य राखून जमावबंदी लागू केली. शहरात जलद कृती दलाला पाचारण केले होते. शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. अशा स्थितीत शनिवारी इचलकरंजी शहरात रमजान ईद शांततेत व उत्साहात साजरी करण्यात आली.
रमजान ईदच्या निमित्ताने पावसासाठी प्रार्थना
प्रतिनिधी, सोलापूर
सोलापूर शहर व जिल्ह्यात शनिवारी रमजान ईद पारंपरिक पद्धतीने आनंददायी वातावरणात साजरी करण्यात आली. मात्र यंदा पावसाळा सुरू होऊन दोन महिने होत आले तरी पावसाने निराशा केली आहे. त्यामुळे सर्वत्र चिंताजनक स्थिती असताना पाऊस पडावा म्हणून मुस्लीम बांधवांनी सामूहिक नमाजाच्या वेळी अल्लाहचरणी प्रार्थना केली.
सोलापूर परिसरात पावसाने जवळपास पाठ फिरविल्यामुळे दुष्काळजन्य संकट ओढवले आहे. खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पिण्याच्या पाण्याचीही टंचाई प्रकर्षांने जाणवत आहे. या पाश्र्वभूमीवर रमजान ईद साजरी करताना त्यावर टंचाईसदृश परिस्थितीचे मळभ होते. शहरात प्रमुख पाच ठिकाणच्या ईदगाह मदानांवर सकाळी सामूहिक नमाज अदा करताना पावसासाठी सर्वानीच प्रार्थना केली. माणूस ईश्वरी भक्तीपासून, निसर्गापासून दूर जात असल्यामुळे दुष्काळासारखी संकटे कोसळतात. मानवाने स्वतला निसर्गापेक्षा श्रेष्ठ समजू नये, असा उपदेश या वेळी मौलवींनी केला. मानवाने अल्लाहपुढे नतमस्तक होऊन आपल्या चुकांबद्दल क्षमायाचना केल्यास ईश्वरकृपा होईल, असे होटगी रस्त्यावरील नवीन आलमगीर ईदगाहवर नमाजाप्रसंगी शहर काझी मुफ्ती अहमदअली सय्यद यांनी सांगितले.
गेले महिनाभर निरंकार रोजे (उपवास) केल्यानंतर ईद साजरी करताना सर्वत्र उत्साह दिसून आला. ईदनिमित्त एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. मुस्लीम बांधवांनी आपल्या घरी ईदचा आनंद व्यक्त करण्यासाठी ‘शिरखुर्मा’ या खास आवडीच्या पेयासह विविध मिष्टान्नाचा बेत होता. या आनंदात सहभागी होत िहदूंसह इतर धर्मीयांनी शुभेच्छा दिल्या. रात्री उशिरापर्यंत रेलचेल चालू होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2015 2:10 am

Web Title: collective prayers due to eid in sangli miraj city
टॅग : Kolhapur,Sangli,Solapur
Next Stories
1 मराठवाडय़ात सर्वत्र ईद उत्साहात साजरी
2 दांगट अभ्यास गटाकडून दुसऱ्या मुदतवाढीस विनंती?
3 आयुक्तांपुढेच जैववैद्यकीय कचरा टाकला जातो तेव्हा..!
Just Now!
X