25 September 2020

News Flash

शाळकरी मुलांची बस उलटून महाविद्यालयीन युवती ठार

प्रियंकाने या बसला हात करून महाविद्यालयापर्यंत सोडण्याची विनंती केली होती.

प्राथमिक व आदित्य इंग्लिश स्कूलची विद्यार्थ्यांना घेऊन उदगीरकडे निघालेली बस सोमवारी सकाळी उलटली.

लातूर : दत्तनगर मादलापूर रस्त्यावरील यशवंत प्राथमिक व आदित्य इंग्लिश स्कूलची विद्यार्थ्यांना घेऊन उदगीरकडे निघालेली बस सोमवारी सकाळी उलटली. या अपघातात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. प्रियंका बोईनवाड (१९) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती अवलकोंडा येथील रहिवासी तर शिवाजी महाविद्यालयात द्वितीय वर्षांला शिकत होती.

प्रियंकाने या बसला हात करून महाविद्यालयापर्यंत सोडण्याची विनंती केली होती. बसचालक मारुती गुडसुरे हा तिला ओळखत असल्याने  त्याने बस थांबवली. प्रियंका गाडीत बसल्यानंतर काही अंतरावर चालकाचा ताबा सुटला आणि बस खड्डय़ात जाऊन उलटली. यात प्रियंकाचा मृत्यू झाला. तर शालेय बसमधील २० ते २२ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस जमादार नामदेव सारुळे व चंद्रकांत कलमे यांनी  घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या तरुणीचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शाळेच्या मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनातही क्षमतेपेक्षा अधिक मुले बसवली जातात. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी अशा वाहनांवर वेळीच कारवाई करण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया अपघातग्रस्तांचे कुटुंबीय व सामाजिक कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 2:37 am

Web Title: college girl killed in school bus accident
Next Stories
1 शेतकऱ्यांच्या लेकींचे अन्नत्याग आंदोलन
2 महावितरणच्या दुर्लक्षामुळे ऊस जळण्याच्या घटनांची पुनरावृत्ती
3 इंटरनेटच्या माध्यमातून २० वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध
Just Now!
X