चंद्रपूर व गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. यासंदर्भात बुधवारी मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. तीत दारूबंदी उठवण्यासाठी एक समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही समिती दीड महिन्यात अहवाल सादर करील, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

यासंदर्भात बुधवारी मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली.  या बैठकीत दोन्ही जिल्हय़ांतील दारूबंदी उठविण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. या बैठकीला उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. चंद्रपूर गडचिरोली या दोन्ही जिल्हय़ांतील दारूबंदी उठवण्यात यावी, यासाठी राज्य सरकारकडे दोन लाख ४० हजार निवेदन प्राप्त झाली आहेत तर दारूबंदी उठवू नये यासाठी २५ हजार निवेदने प्राप्त झाली आहेत. तेव्हापासून वडेट्टीवार यांनी दारूबंदी मागे घेण्यात यावी यासाठी  प्रयत्न चालवले आहेत.