News Flash

सॅमसंग, ओप्पो, विवो आणि जिओ विरोधात गुन्हा दाखल

उत्पादनाची विक्री वाढावी म्हणून जाहिरात करण्यात आली होती.

Complaint Filed against Jio , Vivo , oppo , samsung , Loksatta, loksatta news, Marathi , Marathi news
Complaint Filed against Jio Vivo oppo and samsung in aurangabad

सध्या ग्राहकांना मोफत मोबाईल कॉल आणि इंटरनेट सेवा देण्यामुळे चर्चेत असलेल्या रिलायन्स जिओसह सॅमसंग, ओप्पो, विवो या मोबाईल उत्पादक कंपन्यांविरोधात औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपन्यांनी महापालिकेची परवानगी न घेता शहरात होर्डिंग लावल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पालिकेने संबंधित कंपन्यांविरोधात महाराष्ट्र मालमत्ता कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे.

महापालिका कर्मचारी वामन राघोबा कांबळे यांनी होर्डिंग्ज प्रकरणी पालिकेच्या वतीने सिडको पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्पादनाची विक्री वाढावी म्हणून जाहिरात करण्यात आली होती. मात्र हीच जाहिरात या चार कंपन्यांना महागात पडली आहे.

विनापरवाना फुकटात होर्डिंग बाजी केल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. तसेच होर्डिंग लावताना सुरक्षितता लक्षात घेण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याची तक्रार कांबळे यांनी केली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता याप्रकरणी चारही कंपन्यांवर काय कारवाई होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2017 4:11 pm

Web Title: complaint filed against jio vivo oppo and samsung in aurangabad
Next Stories
1 कर्जमाफीसाठी वेळकाढूपणा -सुप्रिया सुळे
2 हापूस आंब्याला स्वतंत्र भौगोलिक उपदर्शन
3 चंद्रभागेच्या तीरावर वृक्षांचा मेळा बहरतोय!
Just Now!
X