News Flash

पतीने टक्कल लपवल्याची तक्रार

पोलिसांनी कौटुंबिक वादाचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.  

प्रातिनिधीक छायाचित्र

पतीचे टक्कल असल्याची माहिती लग्नाआधी लपवल्याने पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मीरारोड येथील नया नगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल आहे. पोलिसांनी कौटुंबिक वादाचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नया नगर येथील लक्ष्मी पार्क येथे राहणारे मोहम्मद मुर्तजा सय्यद (२९) यांचे एका महिन्यापूर्वी २४ वर्षीय महिलेशी लग्न झाले होते. लग्नानंतर त्या महिलेला सांगण्यात आले की, मुर्तजाच्या डोक्यावर केस नसून त्याला टक्कल आहे. त्यामुळे तो विगचा वापर करतो. हे जाणून महिलेला धक्का बसला. त्यामुळे सतत होणाऱ्या वादामुळे दोघांमधील संबंध ताणले जाऊ लागले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पतीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अधिक तपास सुरू असल्याची माहिती  वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2020 12:07 am

Web Title: complaint of husband hiding baldness abn 97
Next Stories
1 वर्ध्यात मास्क न वापरणाऱ्यांचे वाहन होणार जप्त
2 दिलासादायक! राज्यात आजही नव्या रुग्णांच्या तुलनेत बरं होण्याऱ्यांच प्रमाण अधिक
3 विधानपरिषदेसाठी शिवसेनेच्या ऑफरला उर्मिला मातोंडकर यांचा होकार
Just Now!
X