News Flash

अकोल्यात टाळेबंदीमुळे कडकडीत बंद

रस्त्यांवर शुकशुकाट पाहण्यास मिळाला

लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जिल्ह्यात वाढत्या करोना संसर्गाच्या साखळीला खंडित करण्यासाठी पालकमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या तीन दिवसांच्या टाळेबंदीला शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी अकोला शहरासह जिल्हा कडकडीत बंद आहे. या बंदमधून केवळ वैद्याकीय सेवा व निवडक पेट्रोल पंप वगळण्यात आले आहेत. सर्वत्र शुकशुकाट असून नेहमी गजबजलेल्या बाजारपेठा व रस्ते निर्मनुष्य झाले आहेत.

अकोला जिल्ह्यात करोनाचा प्रकोप कायम आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्णवाढीसोबतच मृत्यूचे प्रमाणाचाही चढता आलेख आहे. करोनाने शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पाय पसरले आहेत. करोनाचा वाढता संसर्ग अनियंत्रित झाल्याने जिल्हा प्रशासन चांगलेच हादरले. करोना साखळीला खंडित करण्यासाठी पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्ह्यात १८ ते २० जुलैदरम्यान तीन दिवसांची टाळेबंदी जाहीर केली. टाळेबंदीची अंमलबजावणी शुक्रवारी सायंकाळी ७ वाजतापासूनच सुरू झाली. पहिल्याच दिवशी शहरातील सर्वच बाजारपेठा बंद आहेत. संचारबंदी असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.

गांधी मार्ग, टिळक मार्ग, टॉवर चौक, शहर कोतवाली चौक, नेकलेस रोड, रतनलाल प्लॉट चौक, सिव्हिल लाइन चौक, जठारपेठ आदी गजबजून राहणारे परिसर निर्मनुष्य झाल्याचे दिसून आले. शहरातील वैद्याकीय सेवांतर्गत दवाखाने, रुग्णालय व औषध विक्रीची दुकाने उघडी होती. राष्ट्रीय महामार्गावरील सर्वच व शहरातील काही निवडक पेट्रोलपंप सुरू ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर शहरांसह ग्रामीण भागामध्ये टाळेबंदीला प्रतिसाद दिसून आला. टाळेबंदीच्या चोख अंमलबजावणीसाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 6:11 pm

Web Title: complete lockdown in akola scj 81
Next Stories
1 राम मंदिरामुळे करोना आटोक्यात येणार आहे का? शरद पवारांचा मोदींना टोला
2 “महाविकास आघाडीतील पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज, कारण…”; चंद्रकांत पाटील यांचा सल्ला
3 औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १० हजार ५३८ वर, १३४ नवे रुग्ण वाढले
Just Now!
X