मंत्री चंद्रकांत पाटील यांची सूचना

सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे आणि पावसाळ्यात पुढील कामांच्या प्रशासकीय पूर्तता करु न पावसाळ्यानंतर कामांना सुरु वात करावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. खड्डेमुक्त महाराष्ट्र मोहिमेत नगर जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चांगले काम केल्याचे कौतुक त्यांनी केले.

राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सभागृहात जिल्ह्य़ातील बांधकाम विभागाचा आढावा मंत्री पाटील यांनी घेतला. या वेळी नाशिक विभागाचे मुख्य अभियंता पगारे, अधीक्षक अभियंता पद्माकर भोसले यांच्यासह विविध उपविभागांचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता आदी उपस्थित होते. पाटील यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांची माहिती घेतली.

राज्यात ४० हजार किमी. रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी २ लाख ४ हजार कोटीचा निधी उपलब्ध करु न दिला जाणार आहे. याशिवाय, दहा हजार किमीच्या रस्त्यांसाठी यापूर्वीच वार्षिक करार पद्धतीने कामे दिली आहेत. त्या रस्त्यांवर खड्डे पडले अथवा रस्ते खराब झाले तर त्याच्या दुरु स्तीची अट संबंधित ठेकेदारावर टाकण्यात आली आहे. तसेच यापुढे दहा किमीच्या रस्त्यांवर कामे करताना प्रत्येक ठिकाणी कोणत्या प्रकारचे काम करणे आवश्यक आहे, हे पडताळून त्यापद्धतीने कामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.  येत्या अर्थसंकल्पात नमूद असणारी कामे नोव्हेंबरमध्ये सुरु  होतील, हे पाहावे आणि सध्याची कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, मात्र अधिकाऱ्यांनीही कामांचा दर्जा आणि गुणवत्ता सर्वोत्कृष्ट राहील, यासाठी दक्ष राहिले पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी केली.

दबावाला बळी पडू नका

रस्त्यांवरु न प्रवास करताना महिलांसाठी स्वच्छतागृहं नसतात. विभागाने जिल्ह्यात यासाठी पुढाकार घेऊन काम करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. याशिवाय, विभागाच्या जागेवर शासनाच्या योजनांची माहिती देणारे जाहिरात फलक वार्षिक करारावर इतरांना उपलब्ध करु न देण्याचा विचार आहे, त्यातून राज्याला दरवर्षी साधारण ५०० कोटीहून अधिक उत्पन्न मिळेल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. खड्डेमुक्त रस्ते मोहिमेत चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या व कोणत्याही दबावाला बळी न पडता काम करण्याचा सल्ला दिला.