News Flash

चंद्रपूर जिल्ह्यात लॉकडाउनच्या निर्णयाचा पुरता गोंधळ; आणखी वाढवले सहा दिवस

१७ ते २० जुलै पर्यंतची टाळेबंदी सहा दिवस पुढे वाढवली

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

करोना टाळेबंदीवरून जिल्हा प्रशासनाचा पुरता गोंधळ उडाला असून काल मंगळवारी १७ ते २० जुलैपर्यंत चंद्रपूर शहरात टाळेबंदी जाहीर केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आज नव्याने घोषणा करीत १७ ते २६ जुलैपर्यंत चंद्रपूर शहर, दुर्गापूर व ऊर्जानगर येथे टाळेबंदी जाहीर केली आहे. त्यात २१ जुलैपर्यंत कडक आणि २१ ते २६ पर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, या काळात घराबाहेर पडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

करोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, येत्या १७ जुलै ते २६ जुलैपर्यंत लॉकडाउन केला जाणार आहे. लॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंसह सर्व दुकाने बंद असतील. ही टाळेबंदी केवळ चंद्रपूर शहर, दुर्गापूर व ऊर्जानगरसाठी मर्यादित असेल. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातीत उर्वरित ग्रामीण भागातील नागरिकांनी १७ ते २६ जुलै या काळात चंद्रपूर शहरात येऊ नये, चंद्रपूर शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना संस्थात्मक अलगीकरणात राहणे बंधनकारक आहे.

नागरिकांनी माहिती लपविल्यास तसेच प्रशासकीय कामात अडथळा आणल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अत्यावश्यक असल्यास बाहेर पडावे. मास्कचा वापर अनिवार्य असून योग्य पद्धतीने मास्क वापरले जावे. तसेच दैनंदिन काम करीत असताना सुरक्षित अंतर ठेवून काम करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये लग्न समारंभामुळे बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लग्न व समारंभ करण्यासाठी अनेक बंधने टाकली जातील असे त्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांनी लग्न व अन्य समारंभाचेआयोजन काही काळासाठी पुढे ढकलावे असे आवाहनही त्यांनी केले. चेक पोस्टवर तपासणी आणखी कठोर करण्यात आली आहे. तपासणीच्या वेळेस नाव, मोबाईल नंबर, पत्ता देणे अनिवार्य असणार आहे. जिल्ह्याामध्येबाधितांवर योग्य उपचार केले जात असून सर्व वैद्यकीय सोयी सुविधा कोविड केअर सेंटरमध्ये पुरविल्या जात आहे. जिल्ह्यात एकहीबाधितांचा मृत्यू झालेला नाही ही बाब समाधानाची आहे. लक्षणे आढळून आल्यास तात्काळ आरोग्य विभागाला माहिती देऊन तपासणी करणे गरजेचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 8:03 pm

Web Title: confusion over lockdown decision in chandrapur district increase six more days aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 नालासोपारा दरोड्यात छोटा राजन टोळी सहभाग
2 यवतमाळ जिल्हा परिषदेची अधिकाऱ्यांशिवाय करोना लढाई
3 यवतमाळ : दिग्रस येथे नाला ओलांडताना आलेल्या पुरात मायलेकी गेल्या वाहून
Just Now!
X