तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा महत्त्वपूर्ण मेळावा रविवारी वैतरणा नगर येथे होणार आहे. मेळाव्यात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची व्यूहरचना, संघटनात्मक चर्चा, विकासकामांचा आढावा, तालुक्यातील मूलभूत प्रश्नांवर चर्चा तसेच आगामी वाटचालीतील महत्त्वाच्या विषयांवर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे.
याबाबतची माहिती तालुकाध्यक्ष कचरू डुकरे यांनी दिली. आ. निर्मला गावित यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होईल. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपत सकाळे, माजी जि. प. सदस्य जनार्दन माळी, माजी सभापती संपतराव काळे आदी मार्गदर्शन करणार आहेत. मतदारसंघात झालेली विकासकामे, प्रस्तावित कामे, पूर्णत्वाच्या मार्गावर असलेली कामे तसेच रखडलेली कामे याबाबतही विचारविनिमय व पूरक चर्चा होणार आहे.