काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नांदेडलाही निधी मिळाला नाही, मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला असं त्यांनी सांगितलं आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण परभणीत पोहोचले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अशोक चव्हाण यांना यावेळी रस्त्यांवरील खड्ड्यांसंबंधी प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. “चंद्रकांत पाटील यांनी केलेले खड्डे बुजवण्याचं काम माझ्याकडे असून तेच मी करत आहे. संपूर्ण मराठवाड्यात चांगले रस्ते झाले पाहिजेत यासाठी मी विमानाने नाही तर कारने फिरत आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

ganesh naik, sanjeev naik, thane, lok sabha election 2024, shiv sena, shinde group, sanjeev naik
ठाण्यासाठी नाईक नकोतच, शिवसेना नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
Praniti Shinde, solapur
भाजप समर्थकांकडून चारित्र्यहनन होण्याची प्रणिती शिंदे यांना भीती
Due to Shiv Senas aggressiveness Congress defeat in Mahavikas Aghadi
शिवसेनेच्या आक्रमकपणामुळे काँग्रेसची फरफट

आणखी वाचा- आपण पक्ष सोडला म्हणून अनागोंदी चाललीये असं होत नाही; गिरीश महाजनांचा खडसेंना टोला

अशोक चव्हाण यांनी यावेळी पुन्हा एकदा शिवसेनसोबत महाआघाडी करण्यासंबंधी खुलासा करत दिल्लीतील नेते नाराज होते असं सांगितलं. “शिवसेनेसोबत जाण्याबद्दल दिल्लीमधील नेत्यांमध्ये नाराजी होती. दुसरीकडे राज्यात भाजपाकडून काँग्रेस संपवण्याची कारवाई सुरू होती. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सरकारमध्ये सामील व्हावे लागेल हे मी स्वतः जाऊन दिल्लीतील नेत्यांना पटवून दिलं. यानंतरच आपण महाविकास आघाडीत सामील झालो,” असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.