भाजपा पक्षाने सत्ता मिळवण्यासाठी जनतेला मोठी मोठी आश्वासन देऊन त्यांचा घात केला आहे. त्यांच्या आश्वासनाला जनता पुन्हा बळी पडू नये यासाठी मतदारांना जागृत करण्यासाठी औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रत्येक मतदार संघ, प्रत्येक वार्डात जाऊन भाजपा सरकार विरोधात एल्गार यात्रा काढणार असल्याची माहिती सोमवार दि.१७ रोजी आ.अब्दुल सत्तार जिल्हा काँग्रेस अध्यक्ष यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
दि.२४ सप्टेंबर रोजी स्व.राजीव गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या एल्गार यात्रेची सुरवात करण्यात येणार आहे. एल्गार यात्रेत काँग्रेस पक्षातील जेष्ठ नेत्यांपासून सामान्य कार्यकत्र्यांपर्यंत सर्व आजी, माजी नेते यात सहभागी होणार आहे. दरम्यान ही यात्रा कोणत्याही पंचतारांकीत हॉटेल किंवा आरामदायी सोयी सुविधा न घेता शाळा-मंदीराच्या ठिकाणी थांबून विश्रांती घेईल, आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी कामाला सुरवात करेल. भाजपा सरकारने सत्ता मिळवण्यासाठी दिलेले विविध आश्वासने किती फसवे आहे, याची पुर्ण माहिती जनतेला मिळावी आणि येणाऱ्या २०१९ च्या निवडणूकीत जनता भाजपा सरकारच्या भूल-थांपाना बळी पडूनये हा एल्गार यात्रेचा मुळ उद्देश असून याचा समारोप हा अशोकराव चव्हाया यात्रेमुळे काँग्रेस पक्षाला आलेली मरगळही दुर होईल असा विश्वास जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ.अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे.यावेळी मा.आ कल्याण काळे. मा.आम नामदेवराव पवार यांच्या सह मोठ्या संख्येने पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.
महाआघाडीत एमआयएम, मनसेला स्थान नाही
आगामी लोकसभा, विधानसभा मध्ये होऊ घातलेल्या महाआघाडी मध्ये एमआयएम आणि मनसेला स्थान मिळणार नाही. कारण हे दोन्ही पक्ष लोकशाहीवादी नसून समाजा-समाजात तेढ निर्माण करून नागरिकांमध्ये विष पेरण्याचे काम करतात. त्यामुळे या दोन्ही पक्षांना महाआघाडीत स्थान देण्याय येणार नसल्याची वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्याची माहिती आ.अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
प्रकाश अंबेडकर यांच्या निर्णयाची प्रतिक्षा 
भारपि बहूजन पक्ष हा येणाऱ्या निवडणूकीसाठी एमआयएम पक्षा सोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या होत आहे. मात्र अद्यापही काँग्रेस पक्षाची बोलनी प्रकाश अंबेडकर यांच्या सोबत चालू आहे.त्यांच्या अतिंम निर्णयाची प्रतिक्षा आम्हाला असून ते आमच्या सोबत आले तर त्यांचे स्वागतच असेल अशी माहिती आ.अब्दुल सत्तार यांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress campaign against bjp in every constituency
First published on: 17-09-2018 at 18:34 IST