News Flash

मराठा आरक्षण; भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसची समिती

भाजपच्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी सावंत यांच्यावर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सौजन्य- Indian Express

जालना :  मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या समविचारी सामाजिक संघटनांकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पक्षाच्या तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे.

मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाकडून अशा समितीची आवश्यकता व्यक्त केली होती. त्यानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून या समितीची स्थापना करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा प्रवक्ते सचिन सावंत, प्रवक्ते अतुल लोंढे, आणि डॉ. संजय लाखे पाटील यांचा समितीमध्ये समावेश आहे.

भाजपच्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी सावंत यांच्यावर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर अतुल लोंढे यांच्यावर अमरावती आणि नागपूर महसूल विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. लाखे-पाटील यांच्यावर पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई विभागाची जबाबदारी काँग्रेस पक्षाने सोपविली आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात भाजपा व त्यांच्या समविचारी सामाजिक संघटनांनी अपप्रचार चालविल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचा आहे. या विरोधात काँग्रेस पक्षाची योग्य ती भूमिका मांडणे आणि आरक्षणाच्या अनुषंगाने संसदीय, न्यायालयीन आणि कायदेशीर बाजूची सत्यता जनतेसमोर मांडण्याची आवश्यकता अशोक चव्हाण यांनी प्रदेश काँग्रेसकडे सूचित केली होती. त्यानुसार स्थापन झालेल्या समितीमधील सदस्यांना त्यांना नेसून दिलेल्या भागातील मुख्यालयाच्या ठिकाणी दौरा करून विविध व्यासपीठावरून आपली भूमिका मांडण्याची सूचना प्रदेश काँग्रेसने केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2021 12:05 am

Web Title: congress committee responds to maratha reservation bjp akp 94
Next Stories
1 कुकडीच्या पाण्यासाठी खमका आमदार हवा – शिंदे
2 वडिलांसह तिघांकडून मुलाचा मारहाण करून खून
3 नगर शहरातील निर्बंधांमध्ये १५ मेपर्यंत वाढ
Just Now!
X