News Flash

यवतमाळमध्ये काँग्रेस नगरसेवकासह पाच आरोपींना अटक

सहा देशी कट्टे, जिवंत काडतूसे जप्त

(संग्रहित छायाचित्र)

सहा देशी कट्टे, जिवंत काडतूसे जप्त

अवैध शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी काँग्रेस नगरसेवक सलीम शहा सुलेमान शहा ऊर्फ सलीम सागवान याच्यासह पाच जणांना अटक केली व त्यांच्याकडून सहा देशी बनावट कट्टे आणि बारा जिवंत काडतूसे जप्त केली.

ऑगस्ट २०१७ मध्ये लोहारा पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्य़ात पोलिसांना हवा असलेला आरोपी रवि गणेश उमाळे हा शहरात देशी कट्टे विकतो व तो नागपूर मार्गावरील भाग्यनगर ते मल्हारनगरमध्ये असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यांनी उमाळे याच्यासह पाच जणांना सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून सहा देशी कट्टे, बारा जिवंत काडतुसे, एक अर्धवट जळालेले काडतूस व एक मोटारसायकल जप्त केली. आरोपींमध्ये काँग्रेस नगरसेवक सलीम शहा सुलेमान शहा ऊर्फ सलीम सागवान, राम ऊर्फ चिमनलाल शर्मा, नीलेश धरमदास सोनुरे, चंद्रप्रकाश ऊर्फ तातू रमाकांत मुराब आणि रवि गणेश उमाळे यांचा समावेश आहे. त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

रवींद्र गणेश उमाळे याच्याजवळ क्रमांक पट्टी नसलेली मोटारसायकल पोलिसांना सापडली. डिक्कीत एक देशी बनावटीचे पिस्तूल होते, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. रवि हा देशी कट्टे आणि काडतूस विकतो. त्याने आतापर्यंत विदर्भात कोणाला शस्त्रे विकली, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2018 1:26 am

Web Title: congress corporator arrested in crime case
Next Stories
1 एकनाथ खडसेंनी घेतली राहुल गांधींची भेट?
2 धुळ्यात पोलीस निरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या
3 उद्योगांना जागा आणि प्रकल्पग्रस्त वाऱ्यावर!
Just Now!
X