करोना महामारी व लॉकडाउनमुळे आधीच घसरत चाललेला भारतीय अर्थव्यवस्थेचा चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीतील विकास दर (जीडीपी) उणे २३.९ टक्क्यांनी घसरला. जीडीपीची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर मोदी सरकारला लक्ष्य केलं जात आहे. काँग्रेसनंही सरकारवर टीका केली असून, काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असलेल्या ‘रसोडे में कौन था’च्या ओळीतून मार्मिक टीका केली आहे.

३१ ऑगस्ट रोजी मागील तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी जाहीर करण्यात आली. तिमाहीगणिक आकडेवारी प्रसिद्ध करण्याच्या १९९६ पासून सुरू झालेल्या प्रघातापासून, नकारात्मक आर्थिक विकासाची ही सर्वात भयाण आकडेवारी असून, एकूणच आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थांमधील सर्वात वाईट कामगिरीही आहे.

आकडेवारी जाहीर झाल्यानंतर मोदी सरकारवर टीका होऊ लागली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही ‘रसोडे में कौन था’च्या ओळींवरून व्यंगात्मक ट्विट केलं आहे.

काय म्हटलं ट्विटमध्ये?

कल जनता की आँखो मे धूल झोकी थी और वो दुबारा सोने गयी थी।
तुम विकास का सपना दिखाकर जनता के पास आये ते तब रसोडे में कौन था
वहां कौन था?
काँग्रेस थी? भाजपा थी?
काँग्रेस थी? भाजपा थी?
कौन था?
कौन था?

कौन था?????

मोदीजी
(मोदीजी थे)…

७० साल का विकास निकाल दिये और भारत का जीडीपी डुबा दिया, जीडीपी डुबा दिया
डुबा दिया, हां डुबा दिया।
मोदीजी
(मोदीजी थे)…(मोदीजी थे)…

भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीचा दर सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत शून्याखाली घसरून २३.९ टक्क्यांनी घसरला. अर्थविश्लेषकांनी वर्तविलेल्या पूर्वअंदाजांपेक्षा प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेची अधोगती मोठी असल्याचे ही आकडेवारी दर्शविते. देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन (२०११-१२ च्या स्थिर किमतीनुसार) २०२०-२१ आर्थिक वर्षांच्या प्रथम तिमाहीत २६.९० लाख कोटी रुपये अंदाजण्यात आले आहे, जे २०१९-२० च्या प्रथम तिमाहीत ३५.३५ लाख कोटी रुपये होते. म्हणजे २०१९-२० च्या पहिल्या तिमाहीत दिसलेल्या ५.२ टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत ते २३.९ टक्क्यांनी आकुंचन पावले आहे, असे ‘एनएसओ’ने दिलेल्या निवेदनातून स्पष्ट केलं होतं.