वर्षांनुवर्षे आंदोलने करून पै पै रुपयांनी मानधनात वाढ करून घेणाऱ्या राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन तर सोडाच, पण नियमित मानधनही मिळेनासे झाल्याने काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे एव्हाना कळून चुकले आहे. काँग्रेसने वाढीव मानधन देऊ, असे खोटे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली, तर भाजपने त्यांच्यासाठी आलेला पैसा इतरत्र खर्च करून त्यांची लूट केली.
राज्यात २ लाख ८ हजार अंगणवाडी कर्मचारी असून, विदर्भात त्यातील निम्मे कर्मचारी आहेत. अंगणवाडी सेविकांना गेल्या वर्षीच्या जानेवारीपर्यंत १ हजार ५०, मदतनिसास ५०० रुपये आणि मिनी अंगणवाडी सेविकेस ४५० रुपये मिळायचे. त्यांना अनुक्रमे ९५०, ५०० आणि ४५० रुपयांची वाढ ३० एप्रिल २०१४ लागू करण्याचे आश्वासन काँग्रेस शासनाने दिले होते. मात्र, वित्त विभागाकडून वाढीव मानधनास मंजुरी घेण्यात न आल्याने ते मिळालेच नाही.
शासनाच्या एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अंगणवाडी सेविकांना राज्य आणि केंद्र शासनाचे अनुक्रमे १ हजार ५० आणि ३ हजार रुपये, असे एकूण ४ हजार ५० रुपये मानधन मिळायचे. त्यात वाढीव मानधनामुळे त्यांना लगेच ५ हजार ५० रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र, त्यांचे वाढीव मानधन तर दिले नाहीच, पण नियमित मानधनही सध्याच्या सरकारने थकित ठेवले आहे. केंद्र शासनाकडून राज्य शासनाला मिळणारा निधी इतर कारणांसाठी वापरून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे सचिव श्याम काळे यांनी केला आहे. भाजप शासनाने २०१५-१६ या वर्षांच्या अर्थसंकल्पात अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी १७६ कोटींची तरतूद केली आहे. मात्र, एप्रिल २०१४ पासून न देता ते एप्रिल २०१५ पासून देण्याचे परिपत्रक काढले. अंगणवाडी कर्मचारी सध्या ४२ प्रकारच्या नोंदी करतात. त्यात आणखी १२ प्रकारच्या नोंदींचा समावेश शासनाने केला असून, त्या तुलनेत त्यांना वेतन मात्र दिले जात नाही.

ढिगभर कामांच्या नोंदी
सर्वेक्षण, आहारवाटप, आहारचे बिल, गर्भवती माता नोंदणी, बालक व माता वाढ नोंदणी, प्रगती नोंदणी, लसीकरण, आरोग्य तपासणी, जन्म व मृत्यू, अंगणवाडी साहित्य साठा, गृहभेट, संदर्भ सेवा, जन्म-मृत्यू समिती सभा कामकाज, माता समिती सभा कामकाज, अर्धवार्षिक वाढदिवस, औषध वाटप, किशोरवयीन मुलींचे सर्वेक्षण, किशोरवयीन नोंदणी, किशोरवयीन तांदूळ वाटप, किशोरवयीन मुलींचे स्वस्त दुकानदाराने भरावयाचे, कुपोषित मुले, आपली अंगणवाडी समिती, ग्राम आरोग्य पाणी पुरवठा व सत्यता समित्यांचे कॅशबुक, प्रोसेडिंग, हजेरी आणि बिल, असे चार रजिस्टर, महत्त्वाचे परिपत्रक, इतर सभा, पंतप्रधान निधी अंतर्गत ‘फूड’, आहारावर देखरेख समिती, बालक सभा, किशोरी शक्ती, महिला मंडळ, किशोरी बैठक, वृद्धांसाठी मार्गदर्शिका आणि समन्वय समिती.
आणखी १२ नोंदींची भर
सर्वेक्षण, गोषवारा, लसीकरण, श्रेणीकरण, गृहभेटी नियोजन, अ जीवनसत्त्व नोंद, संदर्भ सेवा, आहार पंजी, पूर्व प्राथमिक शिक्षण, आहार वाटप, गर्भवती माता भेट आणि ‘डाटा एंट्री’

dhule srpf marathi news,
धुळे: गैरहजर कर्मचाऱ्यांकडून लाच स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक ताब्यात
Farmer's Anger, Unmet Demands, Kishore Tiwari, Impact Mahayuti, Maharashtra, lok sabha elections, lok sabha 2024, election 2024, yavatmal news, marathi news, politics news,
कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा महायुतीला फटका, किशोर तिवारींचा दावा,’ ३० जागांवर…’
trangenders, beggars,
पुणे : नागरिकांना अडवून पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीय, भिक्षेकऱ्यांविरुद्ध खंडणीचे गुन्हे दाखल करा; पोलीस आयुक्तांचा आदेश
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप