News Flash

जागावाटपाच्या निर्णयावरून काँग्रेस आक्रमक

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जागावाटपाच्या मुद्द्यावरून शनिवारी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला.

| July 26, 2014 05:07 am

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जागावाटपाच्या मुद्द्यावरून शनिवारी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला. औरंगाबादमधील काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात राष्ट्रवादीने जागावाटपाबाबतचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, असा सूर उमटताना दिसला. खासदार राजीव सातव यांनी राष्ट्रवादीने आघाडीसंदर्भातील निर्णय तातडीने घ्यावेत असे सांगितले. त्यामुळे निवडणुकीत कोणासोबत रहायचे आणि कोणाविरुद्ध लढायचे हे चित्र स्पष्ट होईल, असे म्हणत जागावाटपाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक असल्याचे त्यांनी दाखवून दिले. तर दुसरीकडे, आगामी निवडणुकांमध्ये लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना लवकरात लवकर कामाला लागण्याचा सल्ला काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 5:07 am

Web Title: congress demands to take alliance decision immediately by ncp
टॅग : Congress,Ncp
Next Stories
1 बेळगावमधील मराठी फलकावरील कारवाईने कोल्हापुरात तणाव
2 विसापूरला ६ मानवी सांगाडे आढळले
3 सांगलीत टोळय़ांनी मांडला लग्नाचा बाजार
Just Now!
X