24 February 2018

News Flash

रस्त्यावर खड्डेच पडले आहेत, आभाळ नाही कोसळले – चंद्रकांत पाटील

१५ डिसेंबर पर्यंत खड्डे दिसणार नाहीत ही पाटील यांचीच घोषणा

परभणी | Updated: November 14, 2017 8:55 PM

चंद्रकांत पाटील (संग्रहित छायाचित्र)

रस्त्यांवरच्या खड्ड्यांबाबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. रस्त्यावर खड्डे पडणे म्हणजे आभाळ कोसळणे नाही. पाऊस आला की खड्डे पडतातच. आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राला भरीव निधी मिळाला नाही. त्यामुळे जास्त काळ टिकतील अशा रस्त्यांची निर्मितीच झाली नाही. याच कारणामुळे राज्याला खड्ड्यांची समस्या सतावते आहे. आत्ता रस्त्यांवर पडलेले खड्डे हे आघाडी सरकारच्या काळातले आहेत. नव्याने कोणतेही खड्डे पडले नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. परभणीत झालेल्या एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले.

१५ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे असणाऱ्या रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मात्र डेडलाईन जवळ आलेली असताना चंद्रकांत पाटील यांनी अशा प्रकारे वक्तव्य करणे म्हणजे त्यांचे आश्वासन पूर्ण न होण्याची जाणीव आहे असेच दिसते आहे. राज्यातल्या सगळ्या प्रमुख शहरांमध्ये खड्डे ही समस्या मोठी आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर ‘सेल्फी विथ खड्डा’ अशी मोहिमही हाती घेतली. विरोधकांनी खड्ड्यांच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर टीकाही केली होती.

मोठ्या प्रमाणावर टीका झाल्याने चंद्रकांत पाटील यांनी १५ डिसेंबर पर्यंत एकही खड्डा दिसणार नाही अशी घोषणाच करून टाकली. त्यांच्या या घोषणेमुळे विरोधकांची तोंडं काही प्रमाणात बंद झाली खरी मात्र मागील तीन वर्षात खड्डाच पडला नाही असे सांगत त्यांनी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे खापरही आघाडी सरकारवरच फोडले आहे. तसेच एकीकडे खड्ड्यांमुळे लोकांचे बळी जात असूनही खड्डे पडणे ही काही आभाळ कोसळण्याएवढी मोठी समस्या नाही असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे विरोधकांना टीका करण्यासाठी नवा मुद्दाच मिळाला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

First Published on November 14, 2017 8:55 pm

Web Title: congress government responsible for road potholes says minister chandrakant patil
टॅग Potholes
 1. A
  Arvind
  Nov 15, 2017 at 6:22 pm
  काय राव दादा अस बोलू नका खड्ड्यामुळे लोकांचे जीव चालले आहेत ...आघाडी ने काम केले नाही म्हणून तर तुम्हाला निवडून दिले ...आता तीन वर्षे झाली राव अजून 10 वर्षे आघाडी सरकारच्या नावाने खडे फोडा म्हणजे झाल ...
  Reply
  1. A
   arun
   Nov 15, 2017 at 6:31 am
   पाटील साहेबांची स्मरणशक्ती खूपच तल्लख असणार. म्हणूनच जुने खड्डे कोणते, नवीन कोणते ते त्यांना पटकन ओळखता येतात. आणि आभाळच कोळलेलं नाही हे मात्र खोटं कारण पृथ्वी चंद्रासारखी खड्डेदार झाली आहे. जणू चंद्रच कोसळलाय. आभाळच खाली आलंय. म्हणूनच मुंबईतले आर्मस्ट्राँग सुखात आतबसले आहेत आणि जनता रस्त्यांवरून उड्या मारत चालते आहे.
   Reply
   1. S
    shrikant
    Nov 14, 2017 at 11:02 pm
    असं वाटत चंद्रकांत पाटील, किरीट सोमैय्या आणि आशिष शेलार वेगवेगळ्या पक्षात आहेत. एकूणच भाजपचे सर्वच विनोदी आहे. सोशल मीडियाच्या पगाऱ्यांना जरा जास्त पगार देऊन खड्डे भरायची कामे तरी करून घ्यायची. एरवी फुकाचे शब्दच्छल करून जागते रहो म्हणणाऱ्यांना तेवढीच घाम गाळून झोप तरी येईल !
    Reply
    1. R
     rohan
     Nov 14, 2017 at 10:46 pm
     बोलले आणि बरगळले.... आहो रोडकरी कडून तरी काही आदर्श ठेवा....तो माणूस 17 वर्षा नंतर पण एक्सप्रेस वे चे कामाच्या कौतुक मोठ्या रुबाबने करतो....आणि तुम्ही अजूनही मागच्याच फेल झालेल्या पोरचव रडगाणे घेऊन बसतात...थोडी तरी vison दाखवा रास्तेबांधणीत आणि बांध की एखडा iconic रस्ता आपल्या कार्यकाळात....एक्सप्रेस वे सारखा....ते सोडून हे अजूनही खड्यातच पडले आहेत
     Reply
     1. A
      anand
      Nov 14, 2017 at 9:52 pm
      खड्ड्यांमुळे लोक मरतात. त्यांची हाडे खिळखिळी होतात,गर्भवतींवर संकट कोसळते ,वाहने नादुरुस्त होतात, इतकेच.त्याने काही आभाळ कोसळत नाही कि माझे मंत्रिपद जात नाही . शरद पवार नि उद्धव ठाकरे जोपर्यंत एक होत नाहीत तोपर्यंत चिंता कशाला?? कुठे असते हो हे आभाळ?
      Reply
      1. A
       anand
       Nov 14, 2017 at 9:34 pm
       गरिबांना जेवण नाही, महिलांना सुरक्षा नाही ,बालके मरतात , स्वच्छता नाही ,पाणी पुरेसे नाही, दवाखान्यात औषधे नाहीत,डॉक्टरही नाहीत ,विद्यार्थ्याना शिक्षण नाही,परीक्षांचे निकाल लागत नाहीत इतकेच तर आहे.काही आभाळ कोसळले नाही. फडणवीस मुख्यमंत्री आहेत नि मी महसूल मंत्री आहे,उद्धव ठाकरे काही झाले तरी सरकार सोडणार नाही. अजून काय हवे?? हेच तर चांगले दिवस आहेत.
       Reply
       1. S
        satyawan
        Nov 14, 2017 at 9:33 pm
        Maj aahe ha sattecha
        Reply
        1. सचिन
         Nov 14, 2017 at 9:27 pm
         आभाळ कोसळेपर्यंत वाट पाहणार का?
         Reply
         1. चंद्रकांत
          Nov 14, 2017 at 9:15 pm
          खड्यात यांचा कोण कोसळून मेल्याशिवाय याना कळणार नाही.
          Reply
          1. Load More Comments