News Flash

अपमान केला तरीही शरद पवार काँग्रेसच्याच सोबत : नरेंद्र मोदी

मोदींनी पवारांवर थेट टीका न करता अपमानाची आठवण करुन देत पवारांबद्दलचा 'सॉफ्ट कॉर्नर' दाखवला

“आपल्याला शरद पवारांबद्दल व्यक्तिगत आदर आहे, पवार यांनी जनतेसाठी काम केलं. पण पवार यांची चूक एवढीच होती की, काँग्रेसमध्ये असताना पवारांनी अध्यक्षपदासाठी प्रयत्न केला तर काँग्रेसने त्यांचा अपमान करत त्यांना पक्षातून थेट बाहेरचा रस्ता दाखवला. ज्या काँग्रेसने त्यांना पक्षाबाहेर काढले त्याच काँग्रेससोबत आज पवार साहेब पुन्हा गेले याची खंत वाटते”, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल(दि.23) व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे बारामती, गडचिरोली, हिंगोली, नांदेड, नंदुरबार इथल्या भाजपाच्या बुथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्याबद्दल टिप्पणी करत काँग्रेसवर हल्लाबोल केला. मेरा बुथ, सबसे मजबुत या उपक्रमात ते बोलत होते.

आपल्या संवादाची सुरुवात मराठीतून करत मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. या संपूर्ण संवादादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी पवार यांच्यावर टीका करणे टाळले. उलट अपमान करणाऱ्या काँग्रेसच्याच तंबूत पवार आहेत. तसेच जनतेसाठी पवार यांनी काम केल्याचे सांगत सहानुभूती दर्शविली. यापूर्वी बारामतीच्या भेटीत पंतप्रधान मोदी यांनी ज्येष्ठ नेते पवार यांचे बोट धरून राजकारणात आल्याचे सांगत पवार यांच्यासोबतचे मैत्रीचे संबंध जाहीर केले होते.  पंतप्रधान मोदी यापूर्वी बारामतीत दोन वेळा येऊन गेले आहेत. त्यामुळे ते शरद पवारांवर टीका करतील अशी शक्यता नव्हतीच पण टीका न करता त्यांना फक्त त्यांच्या काँग्रेसमध्ये झालेल्या अपमानाची आठवण करुन देत मोदींनी पवारांबद्दलचा ‘सॉफ्ट कॉर्नर’ दाखवल्याची चर्चा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2019 9:29 am

Web Title: congress insulted sharad pawar still he supports congress says pm modi
Next Stories
1 भाजपच्या प्रभावक्षेत्रात राष्ट्रवादीची कसरत; पंकजा विरुद्ध धनंजय असाच अप्रत्यक्ष सामना
2 राष्ट्रवादी की भाजप? उदयनराजेंचे तळ्यात-मळ्यात
3 मेळघाटातील पुनर्वसितांच्या संघर्षांत बळी कुणाचा?
Just Now!
X