12 July 2020

News Flash

काँग्रेसकडून दलित बांधवांची दिशाभूल केली जाते आहे-रामदास आठवले

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी काँग्रेसच्या धोरणावर टीका केली आहे

'त्या' पराभवाची चौकशी करा- रामदास आठवले

भाजप सरकार दलित समाजाच्या आरक्षणाला धक्का लावत आहे,आणि संविधान बदलण्याचे काम करते आहे हा अपप्रचार काँग्रेसकडून जाणीवपूर्वक केला जातो आहे. दलित समाजात जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करणे हाच यामागचा काँग्रेसचा उद्देश आहे अशी टीका सामाजिक आणि न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली.

एवढेच नाही तर राज्यातले आणि केंद्रातले सरकार अत्यंत उत्तम काम करते आहे. देशातल्या प्रत्येक घटकासोबत हे सरकार आहे अशी ग्वाहीही रामदास आठवले यांनी दिली. विरोधकांकडे आपल्या सरकारविरोधात बोलण्यासाठी काहीही मुद्देच उरले नाहीयेत त्यामुळे अशी काही वक्तव्ये करून भाजप सरकारची बदनामी केली जाते आहे.

दलित बांधवांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचे काम काँग्रेसकडून होते आहे असाही आरोप आठवले यांनी केला. दलित समाजावर होणारा अन्याय हा जातीयवादामुळे होतो आहे. यावर उपाय योजण्याची गरज आहे. तसेच दलित समाजाबाबत काही घटकांमध्ये कटुता बघायला मिळते ही मानसिकता बदलण्याची गरज आहे, असेही रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तानकडून देशाच्या कुरापती काढल्या जातात त्यावर सर्जिकल स्ट्राईक करून सरकारने उत्तर दिले आहे. तरीही पाकिस्तानची खुमखुमी कायम आहे. त्यांना आता केंद्र सरकारने धडा शिकवला पाहिजे अशीही भूमिका आठवलेंनी मांडली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2017 8:22 pm

Web Title: congress is trying to miss lead people says ramdas athavle
Next Stories
1 अल्प भू धारक शेतकऱ्यांना आजपासून कर्जमाफी, शेतकरी आंदोलनाचा सर्वात मोठा विजय
2 उच्चाधिकार मंत्रिगट-सुकाणू समितच्या बैठकीत बच्चू कडू आणि चंद्रकांत पाटील यांच्यात खडाजंगी
3 कोल्हापूरमध्ये घागरा-चोळीतील अंबाबाई बघून भाविक संतप्त, शिवसेनेकडून पोलिसांत तक्रार
Just Now!
X