पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने जनतेला दिलेली एक ही आश्वसन पूर्ण केले नाही.या सरकारच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे राज्यातील जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.त्यावर भाजप सरकार काही करताना दिसत नसून या सरकारमधील मंत्री आणि आमदार महिला विषयी बेताल वक्तव्य करीत आहे.अशा आमदाराना चपलीने मारले पाहिजे.अशा शब्दात काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी राम कदम यांचा महिला बाबत केलेल्या बेताल वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.पुण्यात जनसंघर्ष यात्रे दरम्यान त्यांनी अशोक चव्हाण यांनी भूमिका मांडली.

यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की,राम कदम यांनी मुली पळवून आणण्याबद्दलचे जाहीर वक्तव्य केले.त्या विधानावर भाजपकडून कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नसून ही निषेधार्थ बाब आहे.भाजप ने राम कदम यांच्या आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे.अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

ते पुढे म्हणाले की,केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून आपल्या राज्याची परिस्थिती भीषण असून याला सर्वस्वी जबाबदार हे भाजप सरकार आहे. या सरकारला खाली खेचण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे.असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

ते पुढे म्हणाले की,देशाचा जीडीपी वाढत आहे.हे भाजप सरकारकडून सांगितले जाते आहे.जीडीपी वाढत आहे.तो म्हणजे गॅस, डिझेल आणि पेट्रोल चे दर वाढत आहे.या दरवाढीमुळे सर्व सामान्य नागरिकांचे जीवन जगणे कठीण झाले आहे.महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या अपयशी कारभाराविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने 31 ऑगस्टपासून प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रात काढण्यात आलेली जनसंघर्ष यात्रा आज पुण्यात दाखल झाली.यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, शरद रणपिसे, शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी तसेच आजी माजी पदाधिकारी पुणे शहरातील जनसंघर्ष यात्रेत सहभागी झाले होते.पुणे शहरात काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेत पर्वती आणि हडपसर येथे सभा देखील घेण्यात आली.त्या सभावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर सडकून टीका केली.

मतांची विभागणी टाळण्यासाठी आघाडी करू : अशोक चव्हाण

भाजप सरकार हे कॅन्सर सारखे असून या भाजप सरकारला हद्दपार करण्यासाठी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतांचे विभाजन टाळण्यासाठी आम्ही आघाडी करू अशी अशी भूमिका प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कार्यक्रमानंतर आगामी निवडणुकीत आघाडी बाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली.