सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी राजकारणापासून अलिप्त होण्याचे संकेत दिले आहेत.
नागपूर येथे एका कार्यक्रमासाठी ते आले होते. ते म्हणाले की, मी ५४ वर्षांंपासून राजकारणात आहे. अनेक वर्ष काँग्रेस कार्यसमितीत सक्रिय होतो, पण आता राजकारणात मन लागत नाही, त्यामुळे त्यापासून मुक्त होण्याची इच्छा आहे. द्विवेदी यांनी मधल्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळून पक्ष नेतृत्त्वाची नाराजी ओढवून घेतली होती. तेव्हापासून ते पक्षात बाजूला पडले आहेत.