16 December 2017

News Flash

औरंगाबाद-गंगापूर रोडवरील अपघातात काँग्रेस नेत्याचा मृत्यू

मुंबईला परतताना भीषण अपघात

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 13, 2017 9:06 PM

काँग्रेस नेते संजय चौपाने यांचा अपघाती मृत्यू

औरंगाबाद-गंगापूर रोडवर झालेल्या भीषण अपघातात काँग्रेस नेते संजय चौपाने यांचा मृत्यू झाला आहे. गंगापूर रोडवरील भेंडाला फाटा येथे बस-स्कॉर्पियोचा भीषण अपघात झाला. या अपघातात चौपाने यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्यासह प्रवास करणारे तिघेजण जखमी झाले आहेत. यामध्ये ठाणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर, नवी मुंबईचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे आणि बलदिप सिंह बिस्त यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव संजय चौपाने इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी औरंगाबादमध्ये आले होते. हा कार्यक्रम आटोपून परतत असताना संजय चौपाने यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात चौपाने यांचा जागीच मृत्यू झाला. तर रमाकांत म्हात्रे आणि बाळकृष्ण पुर्णेकर गंभीर जखमी झाले. बाळकृष्ण पूर्णेकर कोमामध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.

इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष सोहळ्याची सुरुवात औरंगाबादेतून करण्यात आली. या सोहळ्याला काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मोहन प्रकाश यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

First Published on August 13, 2017 9:06 pm

Web Title: congress leader killed in road accident in aurangabad