28 November 2020

News Flash

आशय चांगला… यशोमती ठाकूर यांच्याकडून अमृता फडणवीसांच्या गाण्याचं कौतुक

अमृता फडणवीस यांचं 'तिला जगू द्या' हे गाणं होत आहे व्हायरल

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस भाऊबीजेनिमित्त पोस्ट केलेल्या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळाल्याचे सांगत आपण पुन्हा नवीन कलाकृती घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येऊ असं म्हटलं आहे. अमृता यांनी स्त्रियांना समर्पित केलेल्या या गाण्यामध्ये दिवाळीच्या शुभेच्छा देताना त्यांनी स्त्री शक्तीचं महत्व पटवून दिलं आहे. मात्र एकीकडे अमृता यांनी या गाण्याला पसंती मिळत असल्याचं म्हटलेलं असतानाच या गाण्याची निर्मिती करणाऱ्या टी-सिरीजच्या युट्यूब चॅनेलवर या गाण्याला लाईकपेक्षा डिस्लाइक जास्त आहेत. असं असलं तरी मंत्री यशोमती ठाकूर यांनी गाण्याचा आशय चांगला असल्याचं म्हणत त्यांच्या गाण्याचं कौतुक केलं आहे.

“सध्या विविध कारणांमुळे अमृता फडणवीस यांचं हे गाणं व्हायरल होत आहे. गाण्याचा आशय छान आहे. मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. माझ्या शुभेच्छा,” असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या गाण्याचं कौतुक केलं आहे. त्यांनी ट्विटरवर त्यांचं गाणं शेअर करत कौतुक केलं.

आणखी वाचा- नॉटी पुरूषांच्या विचारांची घाण घालवून महाराष्ट्र स्वच्छ करण्यास मदत करा; अमृता फडणवीसांचा राऊतांना टोला

अमृता फडणवीस राजकारणापासून अलिप्त असल्या तरी राज्यातील आणि देशातील वेगवेगळ्या मुद्यांवर त्या भूमिका मांडतात. अनेक वेळा त्या चर्चेतही आल्या. आंतरराष्ट्रीय पुरूष दिनाचं निमित्त साधत अमृता फडणवीस यांनी ट्वीट केलं होतं. आज आंतरराष्ट्रीय पुरूष दिवस आहे आणि जागतिक शौचालय दिनही आहे. यानिमित्ताने मी देशातील सर्व पुरुषांना एक सर्वसामान्य स्त्री म्हणून आवाहन करते की, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन वाईट विचारांच्या काही मोजक्या नॉटी पुरूषांच्या आचार विचारांची घाण फ्लश करून महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी मदत करावी,” असं म्हणत अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टोला लगावला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 10:03 am

Web Title: congress leader minister yashomati thakur praises bjp leader devendra fadnavis wife amruta fadnavis her song tila jagu dya jud 87
Next Stories
1 “ठाकरे सरकार हे देशातले एकमेव राज्य सरकार असेल ज्यांनी…”; वीज बिलांवरुन भाजपा नेत्याचा हल्लाबोल
2 “माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या यशानंतर ठाकरे सरकारची नवीन योजना, माझे लाईट बिल माझी जबाबदारी”
3 पालघर जिल्ह्यातील ‘थॅलेसेमिया’ग्रस्त संकटात
Just Now!
X