03 June 2020

News Flash

भाजपाची कृती ‘गिरे तो भी टांग उपर’ अशीच : सचिन सावंत

भाजपाला खोटे बोलण्याची सवय लागल्याचे ते म्हणाले.

“करोनाच्या संकटात सरकारशी सहकार्य करुन एकजुटीचे दर्शन घडवण्याऐवजी भाजपाने केलेले आंदोलन महाराष्ट्राच्या जनतेला अजिबात रुचलेले नाही. परंतु गर्वाचा फुगा फुटला असतानाही त्यांना वास्तवाचे भान राहिलेले दिसत नाही. भाजपाची एकूण कृती पाहता ‘गिरे तो भी टांग उपर’ अशीच आहे,” असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला. त्यांनी यावेळी भाजपानं शुक्रवारी केलेल्या आंदोलनावर टीका केली.

“भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शुक्रवारी केलेले आंदोलन साफ फसले. लाखो कार्यकर्ते सहभागी झाल्याचा दावा करण्यासाठी दोनदा प्रेसनोट काढण्याची नामुष्की ओढवली. तसेच आंदोलन यशस्वी झाल्याचे दाखवण्यासाठी त्यांचा संख्या वाढीचा वेग पाहता १५ दिवसात अख्खा महाराष्ट्रच सहभागी झाल्याचे दिसले असते,” असे टोला सावंत यांनी लगावला. “भाजपाने यापुढे प्रेसनोटसोबत हाजमोला गोळ्या किंवा त्यांच्या पसंदीचे एखादे पाचक मोफत वाटावे,” अशी खोचक टीकादेखील त्यांनी केली.

आणखी वाचा- मुंबईतले ठाकरे काही करु शकले नाही, नगरच्या कोपऱ्यात बसून रोहित पवार माझं काय करणार??

“आंदोलनासंदर्भात भाजपाने संध्याकाळी ७.०९ वाजता काढलेल्या प्रेसनोटमध्ये राज्यभरातून अडीच लाख कार्यकर्ते सहभागी झाले होते असा दावा केला आणि त्यानंतर ८.५६ वाजता काढलेल्या दुसऱ्या प्रेसनोटमध्ये अडीच लाख कुटुंब व ८,७५,४८७ लोक आंदोलनात सहभागी झाल्याचे म्हटले आहे. १ तास ४७ मिनिटात ६,२५,४८७ ने हा आकडा वाढल्याचे दाखवण्यात आले असून याचा मिनिटाचा हिशोब केला तर एका मिनिटात ५८४५.६७२८९७१ एवढा होत आहे. याच वेगाने भाजपाने गणित केले तर १५ दिवसानंतर अख्खा महाराष्ट्रच आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा करता आला असता,” असं सावंत म्हणाले. “आंदोलनाकडे लोकांनीच काय पण त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही पाठ फिरवल्याचे संपूर्ण राज्याने पाहिले असताना भाजपाचा हा दावा पोकळ व हास्यास्पद असल्याचे दिसते. भाजपाला खोटे बोलण्याची सवयच लागलीय, सतत खोटे दावे करणे आणि नंतर तोंडावर आपटणे हे त्यांच्या अंगवळणी पडले आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 4:24 pm

Web Title: congress leader sachin sawant criticize bjp leaders protest in maharashtra against government jud 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 मनसेत परतल्यानंतर तीन महिन्यात राजकीय संन्यास, हर्षवर्धन जाधवांचा असा आहे प्रवास
2 मुंबईतले ठाकरे काही करु शकले नाही, नगरच्या कोपऱ्यात बसून रोहित पवार माझं काय करणार??
3 …म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेतोय, हर्षवर्धन जाधव यांचा खुलासा
Just Now!
X