18 January 2021

News Flash

“महाराष्ट्रात भाजपाची सत्ता असती तर मुंबईही पेटवली गेली असती”

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

महाविकास आघाडीची सत्ता असल्याने मुंबई व महाराष्ट्र शांत आहे. भाजपाची सत्ता असती तर मुंबईही पेटवली गेली असती. देशात दंगे भडकवणे, सामाजिक सलोखा बिघडवणं हा भाजपाचा डाव आहे. तो डाव मोडून काढला पाहिजे असं ट्विट करत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर टीका केली आहे.

याआधी जय श्रीरामच्या घोषणेवरुनही सचिन सावंत यांनी ट्विटच्या माध्यमातून भाजपावर टीका केली आहे. सचिन सावंत म्हणतात.
देता येत नाही तरुणांच्या हातांना काम, देतात घोषणा जोरात जय श्रीराम जय श्रीराम! हाती हवे ज्यांच्या पेन, पेन्सिल आणि पाठीवर दप्त ते गल्लीबोळात फिरतात घेऊन मशाली आणि पत्थर. घरात नाही पैसा अडका संपले सर्व दाणा-पाणी माय पुसे लेकाला बेटा पाह्य काम देतं का कोनी?

पोरगा म्हणे काम तर मिळत नाय पण फिकर नाय
शोधतोय म्यां गद्दार पाकिस्तानी ते काम महत्त्वाचं हाय
मोदी म्हंत्यात तान भूक इसरा देशासाठी कष्ट भोगा
देशात त्यांना राह्यचं तर जय श्रीराम कहना होगा

माय म्हणे मोदींना सांग गरीबांवर असा काढू नका राग
त्यांचं आपलं एकच रगात गरीबांच्या पोटाला एकच आग
चला बोलू सगलेच आपन वंदेमातरम आनी जय श्रीराम
कमलवाल्यांनो किरपा करा द्या पोटाला भाकरी आनी हाताला काम

अशा ओळीही सचिन सावंत यांनी ट्विट केल्या आहेत आणि भाजपावर टीका केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2020 4:38 pm

Web Title: congress leader sachin sawant criticized bjp on delhi violence scj 81
Next Stories
1 कोरोनाची दहशत महाराष्ट्रातही, नाशिकमध्ये आढळला संशयित रुग्ण
2 प्रेमविवाह न करण्याची शपथ घेणारीच प्रियकरासोबत पळाली
3 धक्कादायक : दहावीचा पेपर पहिल्याच दिवशी फुटला
Just Now!
X