News Flash

शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइनमध्ये राहायची भूक लागली आहे, निरुपम यांचा राऊतांना टोला

फडणवीस - राऊत भेटीनंतर राजकीय चर्चेला उधान

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुंबईतल्या हयात हॉटेलमध्ये भेट झाली. राऊत-फडणवीस भेटीनंतर राज्यातील राजकीय चर्चेला उधान आले आहे. संजय राऊत आणि भाजपाकडून या भेटीमागील कारण स्पष्ट केलं असले तरीही या भेटीची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. यातच आता काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. कंपाऊंडरला सतत चर्चेत राहायची भूक लागल्याचे निरुपम म्हणाले.

राऊत फडणवीस यांच्या भेटीवर संजय निरुपम यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी राऊतांवर नाव न घेता टीका केली आहे. यात त्यांनी संजय राऊत यांनी याआधी केलेल्या विधानावरही टीकास्त्र सोडलं आहे. संजय निरुपम आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ” असे वाटतेय की शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइनमध्ये राहण्याची मोठी भूक लागली आहे. ही भूक नेहमी नेत्यांनाच खाते. ही दुर्भावना नसून वास्तविकता आहे.”

गेल्या काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी एबीपी माझावरील कार्यक्रमात बोलताना मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही कंपाऊंडरकडून घेतो, त्याला जास्त कळतं असं विधान केलं होतं. या विधानाचाही निरुपम यांनी पुन्हा एकदा समाचार घेतला आहे.


फडणवीस भेटीवर राऊतांचे स्पष्टीकरण :
काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. फडणवीस सध्या राज्याचे विरोधी पक्षनेता असून माजी मुख्यमंत्रीही आहेत. तसेच भाजपाने त्यांच्यावर बिहार निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. आमच्यात वैचारिक मतभेद असू शकतात पण आम्ही शत्रू नाही. फडणवीस यांची भेट ही गुप्तपणे मुळीच नव्हती. आमच्या या भेटीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्पना आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले. याआधीही शरद पवार यांचीही मुलाखत घेण्याचा विचार होता. पण करोनाच्या काळामुळे शक्य झाली नाही, असे राऊत म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 1:12 pm

Web Title: congress leader sanjaynirupamtroll sanjay raut nck 90
Next Stories
1 फडणवीस आमचे शत्रू नाहीत, पण…, संजय राऊतांचा नवीन खुलासा
2 नांदेडमध्ये ८३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान
3 ४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध
Just Now!
X