News Flash

“संभाजी भिडे, तुमच्यासारखी माणसं महाराष्ट्राच्या मातीत आहेत हेच दुर्देव”

"नादी ही लागू नका, जड जाईल"

संभाजी भिडे

“तुमच्यासारखी माणसं महाराष्ट्राच्या मातीत आहेत हे दुर्देव आहे. स्त्रियांच्या नादीही लागू नका, तुम्हाला जड जाईल,” असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांना दिला आहे. सांगलीमधील एका कार्यक्रमामध्ये भिडे यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल बोलताना गरोदर स्त्रियांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

भिडे यांनी मुलं न होणाऱ्या महिलांचा उल्लेख ‘वांझ’ असा केला होता. त्यावरुन चाकणकर यांनी भिडे यांच्यावर टीकास्र सोडले आहे. “संभाजी भिडे स्ञीत्व, अस्तित्व, मातृत्व हि शब्द तुमच्यासाठी फार अनाकलनीय आहेत, पेलणार नाही तुम्हाला, उच्चारू नका आणि नादी ही लागू नका, जड जाईल,” असा टोला बोखडे यांनी ट्विटवरुन लागवला आहे. महिलांच्या मातृत्वावरुन वादग्रस्त वक्तव्य करणारी भिडेंसारखी माणसं महाराष्ट्राच्या मातीत आहेत हे दूर्देव असल्याचंही बोखडे म्हणाल्या आहेत. “आज तुम्ही मातृत्वाच्या सन्मानाला धक्का लावला आहे. तुमच्यासारखी माणसं महाराष्ट्राच्या मातीत आहेत, हे दुर्दैव आहे,” असंही चाकणकर आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.

असंच ट्विट महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस शिल्पा बोखडे यांनीही केलं आहे.

काय म्हणाले होते संभाजी भिडे?

सांगलीमध्ये आजोजित एका कार्यक्रमामध्ये बोलताना भिडे यांनी मुलं नसणाऱ्या स्त्रियाचा उल्लेख करताना ‘वांझोट्या बाईला स्त्रीत्व नसतं,’ असा केला होता. राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर हिंदू शांत आहेत हे सांगताना त्यांनी स्त्रियांचा संदर्भ दिला. “जसं नपुंसकत्व आल्यावर पुरुषत्व कमी होतं तसचं वांझ स्त्रीमध्ये स्त्रीत्व कमी असतं. अशा लोकांसाठी आपण नपुंसक आणि वांझ यासारखे शब्द वापरतो. तसंच हिंदूंच झालं आहे. हिंदूंमध्येही राष्ट्रीयत्व या विषयाबद्दल पुरुषत्व आणि स्त्रित्व कमी आहे. राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर हिंदू समाज शंभर टक्के नपुंसक आणि वांझ आहे,” असं वक्तव्य भिडे यांनी केलं होतं.

याआधीही केली आहेत स्त्रियांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

स्त्रियांबद्दल बोलताना भिडेंनी तोल सोडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अशाप्रकारची विधाने केली आहेत. मागील वर्षी नाशिकमधील एका कार्यक्रमामध्ये त्यांनी “माझ्या शेतातला आंबा खाणाऱ्या जोडप्याला आपत्यप्राप्ती होते. १८० जोडप्यांनी हा आंबा खाल्ला असून त्यापैकी दीडशे जोडप्यांना आपत्यप्राप्ती झाली आहे,” असा दवा त्यांनी केला होता. याचबरोबर इस्रोची चांद्रयान २ मोहिमेला अपयश आले तेव्हा अमेरिकेने एकादशीच्या दिवशी चांद्रयान सोडल्यानेच त्यांची चांद्रमोहीम यशस्वी झाली असं वक्तव्य भिडे यांनी केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 8:53 am

Web Title: congress leader shilpa bodkhe criticize sambhaji bhide over his comment about women scsg 91
Next Stories
1 प्राचार्यपदावरून हाणामारी
2 युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी १६ जण इच्छुक
3 टीका टिपणी,विरोधातून नवीन ऊर्जा मिळते- अण्णा हजारे
Just Now!
X