15 October 2019

News Flash

‘काँग्रेस नरेंद्र मोदींच्या बापाची मालमत्ता नाही’

'काँग्रेसची सत्ता आल्यावर नरेंद्र मोदी यांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही'

काँग्रेस नेते वसंत पुरके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना आक्षेपार्ह भाषेचा वापर केला आहे. काँग्रेस मोदींच्या बापाची मालमत्ता नाही असं वक्तव्य वसंत पुरके यांनी केलं आहे. वसंत पुरके यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावेळी वसंत पुरके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही एकेरी भाषेत टीका केली. जनसंघर्ष यात्रेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

काँग्रसेच्या जनसंघर्ष यात्रेचा पाचवा टप्पा पूर्व विदर्भात सुरु झाला आहे. यावेळी काँग्रेस नेत्यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना वसंत पुरके यांनी काँग्रेसची सत्ता आल्यावर नरेंद्र मोदी यांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं आहे.

वसंत पुरके यांनी मोदींच्या काँग्रेस मुक्त भारत घोषणेचा चांगलाच समाचार घेतला. काँग्रेस काही त्यांच्या बापाची मालमत्ता नाही असं वसंत पुरके यांनी म्हटलं. यावेळी वसंत पुरके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावरही टीका केली. ‘शेकडो महिलांचे आयुष्य बरबाद करणारा बाबा राम रहीम मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना अष्टपैलू वाटतो. माझा सल्ला आहे त्यांनी बाबा राम रहीमला आपल्या घऱी घेऊन जावे. बाबा तुम्हाला एखादा पैलू दाखवल्याशिवाय राहणार नाही’, अशा शब्दांत वसंत पुरके यांनी टीका केली आहे.

First Published on January 11, 2019 2:24 pm

Web Title: congress leader vasant purke criticize narendra modi