राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना भेटून आमदारांचे निलंबन मागे घेण्याची विनंती करण्यात येईल. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची सोमवारी सकाळी बैठक होणार असून, त्यात यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
विधिमंडळाच्या कामकाजावर काँग्रेसचा केवळ एक दिवसांचा बहिष्कार होता, असे स्पष्ट करताना आव्हाडांच्या निलंबनाच्या मुद्यांवरून राष्ट्रवादीला यापुढे समर्थन न देण्याचे सुतोवाच केले. आव्हाड यांच्या निलंबनाचा लाभ घेत आपल्या पाच आमदारांचे निलंबन मागे घेण्यास राष्ट्रवादीचे समर्थन प्राप्त करण्याचा काँग्रेस प्रयत्न करणार आहे. राष्ट्रवादीच्या प्रमुख तीन नेत्यांच्या विरोधातील चौकशीला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे बसलेल्या धक्क्य़ातून राष्ट्रवादी सावरण्याआधी विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा सोडविण्यास कॉंग्रेस इच्छुक आहे. काँग्रेस कामकाजात सहभागी होऊन राष्ट्रवादीवर दबाब निर्माण
करणार आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखालील समितीचा निर्णय येईल तेव्हा येईल, पण तोपर्यंत आमदारांचे निलंबन मागे घेण्यात येऊन त्यांना कामकाजात सहभागी होण्याची संधी देण्यात यावी, अशी विनंती राज्यपाल आणि मुख्यमंत्र्याकडे करणार असल्याचे ठाकरे
यांनी सांगितले.