News Flash

भाजपाने खड्ड्यात घालून ठेवलाय ‘महाराष्ट्र माझा’ : अशोक चव्हाण

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत 'कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा' म्हणणारे आता कुठं गेलेत.

अशोक चव्हाण

राज्याभरात रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य आहे. विरोधाकांनी हाच धागा पकडून सत्ताधारी भाजपाला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात भाजपावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’ म्हणणारे आता कुठं गेलेत. त्यांनी तर ‘महाराष्ट्र माझा खड्ड्यात घालून ठेवला’ आहे.’

यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की,आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस ने नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले. मात्र भाजपकडून आघाडी सरकार बाबत अपप्रचार आणि अनेक आश्वसने सत्ते आले. भाजप सत्ते आल्यावर दिलेली आश्वसने विसरले आहे. अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

आणखी वाचा : ‘सनातन आणि संघाच्या संबंधांवर मोहन भागवत यांनी स्पष्टीकरण द्यावे’

शेतकयांच्या आत्महत्येच्या घटना बाबत राज्यात आघाडी सरकारच्या काळात भाजपचे नेते आणि सद्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. आता भाजप सरकारच्या काळात देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. आता कुणावर ३०२ चा गुन्हा दाखल करायचा हे एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारावे.असे विधान प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. हे केवळ खडसेच विचारू शकतात कारण ते कधी कुठे ही जातील. असे विधान करताच उपस्थितामध्ये एकच हशा पिकला. जनसंघर्ष यात्रेच्या समारोपाच्या सभेत ते बोलत होते.

कोल्हापूरच्या देवीचे दर्शन घेऊन ३१ ऑगस्टपासून कोल्हापूरपासून सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे या भागात जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रचा अखेरच्या टप्प्याची समारोप सभा आज पुण्यातील एसएसपीएमएस मैदानावर पार पडत आहे.  विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरातयांच्यासह आजी माजी पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 8:47 pm

Web Title: congress maharashtra chief ashok chavhan blames bjp for underdevelopment
Next Stories
1 फडणवीसांचा कारभार पेशवाईतील नाना फडणविसांसारखाच – विरोधी पक्षनेते
2 पुण्यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या ?
3 …तर कायद्याचे राज्य ढासळेल! : सरन्यायाधीश दीपक मिश्रा
Just Now!
X