24 February 2021

News Flash

…और काँग्रेसने शिवसेना के उद्धव ठाकरे को दुल्हा बना दिया; ओवेसींची कोपरखळी

शिवसेनेनं भाजपाला तलाक दिला

राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीबरोबरच भाजपावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी उपहासात्मक टीका केली. ओवेसी म्हणाले, “भारत पॉलिटिकल मॅरेज अॅक्टनुसार काँग्रेसनं शिवसेनेसोबत, शिवसेनेनं राष्ट्रवादीसोबत लग्न केलं. तर भाजपाचा शिवसेनेसोबत घटस्फोट झाला. आता काँग्रेसनं शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांना नवरदेव बनवलं आहे,” अशी कोपरखळी ओवेसी यांनी चारही पक्षांना लगावली.

तेलंगणातील निर्मल येथील महापालिका निवडणुकांचा प्रचार सुरू आहे. या निवडणुकीच्या प्रचारसभेत खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी महाराष्ट्रातील शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली. ओवेसी म्हणाले,”महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर भारत पॉलिटिकल मॅरेज अॅक्टनुसार काँग्रेस पक्षानं शिवसेनेसोबत विवाह केला. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेसोबत चौथा विवाह केला. एआयएमआयएला देशविरोधी म्हणून शिव्या देणाऱ्या भाजपा आणि शिवसेनेचा तलाक झाला. आता तर काँग्रेसनं शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांना नवरदेव बनवलं आहे. काँग्रेस भारतीय पॉलिटिकल मॅरेज अॅक्टनुसार शिवसेनेसोबत विवाह करते आणि आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करते. ज्यावेळी जाणून घेतलं. तेव्हा कळालं की, महाराष्ट्रात एकच पार्टी आहे, ज्याविरोधात बोलणं गरजेच आहे. नाही बोललो, तर मग कुणाचंही मत मिळत नाही, अशी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपाची अवस्था आहे,” असं ओवेसी म्हणाले.

मलई खायची वेळ आली, तर सगळे एक झाले –

“मत माझ्या नावानं घेतली. जेव्हा मलई खायची वेळ आली, तेव्हा सगळेच्या सगळे एकत्र आले. आता यावर काय बोलायचं? यात समान मुद्दा एकच आहे की, कुणीही जिंकल तरी चालेल, मात्र शेरवानी(एमआयएम) जिंकता कामा नये. असा तिघांचा भारत पॉलिटिकल मॅरेज अॅक्टनुसार संगम झालेला आहे. चौथा निकाह 22 तारखेला करण्याची त्यांची इच्छा आहे,” असं म्हणत ओवेसी यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख पक्षांवर टीकास्त्र सोडलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2020 2:28 pm

Web Title: congress married shiv sena asaduddin owaisi slap maharashtra new political alliance bmh 90
Next Stories
1 पृथ्वीराज चव्हाण यांच्या गौप्यस्फोटावर शिवसेनेकडून खुलासा
2 पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे शिवसेनेचा खरा चेहरा उघड – देवेंद्र फडणवीस
3 नांदेडमध्ये दोन शिक्षकांकडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार, रुग्णालयात मृत्यूशी झुंज
Just Now!
X