20 October 2020

News Flash

काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतलं ताब्यात

हत्या झालेल्या दलित सरपंचाच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना कारवाई

काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हत्या झालेल्या दलित सरपंचाच्या कुटुंबाला भेटण्यासाठी नितीन राऊत चालले होते. पण नितीन राऊत यांना पोलिसांनी आझमगड सीमेवर रोखत पुढे जाण्याची परवानगी देण्यास नकार दिला. यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. काँग्रेसने ट्विट करत ही माहिती दिली आहे. पोलिसांनी रोखल्यानंतर नितीन राऊत आणि त्यांच्या समर्थकांनी तिथेच रस्त्यावर बसून ठि्य्या आंदोलनास सुरुवात केली होती.

काँग्रेसने ट्विट करत उत्तर प्रदेश पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला आहे. युपी सरकार दलित सरपंच सत्यमेव जयते यांची हत्या रोखू शकलं नाही मात्र त्यांच्या घरी पोहोचणाऱ्या भावनांचा संदेश रोखत आहे असं काँग्रेसने म्हटलं आहे.

आझमगड येथील बांसा गावातील दलित सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी मारून क्रूर हत्या करण्यात आली होती. हल्ल्याची गंभीर दखल अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने घेतली आहे. यासाठी या विभागाचे अध्यक्ष आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत दौऱ्यावर गेले असता त्यांना रोखण्यात आलं. उत्तर प्रदेश पोलिसांनी नितीन राऊत यांना पुढे जाण्यास मनाई केली.

पोलिसांनी रोखल्यााने नितीन राऊत यांनी तिथेच रस्त्यावर बसून शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवला.

४२ वर्षीय सत्यमेव जयते यांच्या हत्येमुळे उत्तर प्रदेशात सध्या तणाव आहे. त्यात नितीन राऊत यांच्यावरील पोलीस कारवाईमुळे राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 1:09 pm

Web Title: congress minister nitin raut stopped by up police on azamgarh border sgy 87
Next Stories
1 Good News: दिल्लीत २९ टक्के लोकांच्या शरीरात करोनाविरोधात अँटीबॉडीजची निर्मिती, सिरो सर्वेतून आलं समोर
2 देशात करोनाबाधितांची एकूण संख्या २८ लाखांवर; चोवीस तासांत ६९,६५२ नव्या रुग्णांची नोंद
3 पूर आणि अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या चीनच्या किनारपट्टीला धडकले ‘हिगोस’ वादळ
Just Now!
X