News Flash

राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीचा अद्याप निर्णय नाही- अशोक चव्हाण

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिल्हा शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी चव्हाण लातुरात होते.

अशोक चव्हाण

राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यासंबंधी प्रत्येक जिल्ह्यत कार्यकर्त्यांची मते वेगवेगळी असून, कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन अंतिम अहवाल राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिल्हा शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी चव्हाण लातुरात होते. या शिबिरात शिवराज पाटील चाकूरकर, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील, दिलीपराव देशमुख, अमित देशमुख, त्र्यंबक भिसे आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, आरक्षणाच्या बाबतीत शरद पवारांची भूमिका आम्ही ऐकली. संवैधानिक हक्क अबाधित ठेवून काय भूमिका घेता येते यावर चर्चा सुरू आहे. राज्य व केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर त्यांनी सडकून टीका केली. सरकारची धोरणे निश्चित नाहीत. फळबाग उत्पादकांकडे सरकार दुर्लक्ष करते आहे. आघाडी सरकारच्या काळात सर्वसमावेशक भूमिका घेतली होती, त्याचा आता अभाव जाणवत असल्याचे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2018 3:11 am

Web Title: congress ncp alliance decision pending ashok chavan maharashtra politics
Next Stories
1 केंद्रीयमंत्री नितीन गडकरींबरोबर क्षीरसागरांची राजकीय महामार्ग बांधणी
2 ‘स्टँड अप इंडिया’तून विदर्भाला मिळाले अवघे ६२ कोटींचे कर्ज!
3 सैन्यात जाण्याआधी पुण्याचा तरुण चालवायचा टॅक्सी
Just Now!
X