21 October 2020

News Flash

काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य, सुशीलकुमार शिंदे समर्थकांची सोलापूरमध्ये तोडफोड

सोलापुरातील काँग्रेस कार्यालयासमोर शहर व जिल्ह्यातून कार्यकर्ते आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या समर्थनात घोषणाबाजी केली.

सुशील कुमार शिंदे (संग्रहित छायाचित्र)

माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळल्याने समर्थक कार्यकर्त्यांनी सोलापूर येथील काँग्रेस कार्यालयात तोडफोड करत निर्दशने करत  केली. संतापलेल्या कार्यकर्ते शिंदे यांच्या समर्थनात घोषणा देत तोडफोड केली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतीच पक्षाच्या कार्यसमितीची घोषणा केली आहे. त्यामधून सुशीलकुमार शिंदेंसह देशातील आणखी काही दिग्गज नेत्यांना वगळण्यात आले आहे. पक्षाच्या या भूमिकेवर नाराज होत कार्यकर्त्यांनी निर्दशने केली. दरम्यान, कार्यकर्त्यांच्या निदर्शनाबाबत सुशीलकुमार शिंदे यांनी याबाबत भाष्य करण्यास नकार दिला आहे.

शिंदे हे गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर आहेत. विशेष म्हणजे पक्षाने त्यांच्याकडून काही राज्यांचे प्रभारीपदही काढून घेतले आहे. त्यापाठोपाठ आता कार्यकारिणीतूनही वगळण्यात आल्याने कार्यकर्त्यांमधून नाराजी दिसून आली. सोलापूर शहरातील काँग्रेस कार्यालयासमोर शहर व जिल्ह्यातून कार्यकर्ते आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या समर्थनात घोषणाबाजी केली. यावेळी कार्यालय परिसरात असलेल्या कुंड्या फोडल्या. यामध्ये महिला कार्यकर्त्यांचाही समावेश होता.

दरम्यान, अनौपचारिकपणे बोलताना शिंदे यांनी आपल्याला काहीही अपेक्षा नसल्याचे सांगत पक्षाने आपल्याला खूप दिले आहे. राहुल गांधी यांची नवी टीम चांगली असून त्यांच्याकडून चांगले काम होईल, असा आशावादही व्यक्त केला. या नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातून ५ जणांना संधी देण्यात आली आहे. यात मुकुल वासनिक, अविनाश पांडे, बाळासाहेब थोरात, रजनी पाटील आणि राजीव सातव यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 1:51 pm

Web Title: congress omit sushil kumar shinde name in working committee list supporter agitation against senior leader in solapur
Next Stories
1 पैसा व ईव्हीएमच्या बळावरच जिंकतं भाजपा – राज ठाकरे
2 Raj Thackeray : अविश्वास प्रस्तावावर शिवसेनेची भूमिका काय मला बघायचय ? – राज ठाकरे
3 एकवेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी परवडले, पण मोदीभक्त नको-राज ठाकरे
Just Now!
X