काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी १२ जून रोजी मुंबईचा दौरा करणार आहेत. भिवंडी कोर्टात सुरु असलेल्या खटल्यासंदर्भात ते मुंबईत येणार असल्याची माहिती मिळते आहे. १२ जूनला भिवंडी या ठिकाणी जाऊन आल्यानंत राहुल गांधी यांची गोरेगावमध्ये सभा होणार आहे. या सभेत ते बूथ लेव्हलच्या पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

मे महिन्यातच राहुल गांधी यांना १२ जून रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश भिवंडी कोर्टाने दिले. आरोप निश्चिती करण्याआधी राहुल गांधी यांचे म्हणणे नोंद करून घ्यायचे आहे असे कोर्टाने म्हटले आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग होता असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. ज्यानंतर संघ कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी राहुल गांधी यांच्यावरिोधात मानहीचा खटला दाखल केला आहे.

आता या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी हे काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी आधीच टीका केली आहे. आता भिवंडी दौऱ्यादरम्यान आणि गोरेगाव या ठिकाणी राहुल गांधी नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.