मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिलेल्या पिंपरी बुटी गावातच आत्महत्या केलेल्या प्रल्हाद ताजने या शेतकऱ्याची पत्नी शांता यांनी आत्महत्या केलेल्या गावातूनच काँग्रेसने शनिवारी राज्यव्यापी शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाची सुरुवात केली. येत्या १०-१५ दिवसात कर्जमुक्ती झाली नाही, तर काँग्रेस ९ आणि १० जुलला राज्यभर मोठे आंदोलन उभारेल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिला. या आंदोलनात विदर्भ, मराठवाडय़ातून आलेल्या सात-आठ हजार शेतकऱ्यांच्या सहभागाने काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे चित्र होते.
िपपरी गावातून आंदोलन करू देणार नाही, असा इशारा तेथील सरपंच प्रफुल्ल बोबडे व काही लोकांनी दिला होता. मात्र, त्याचा परिणाम दिसला नाही.  प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष कमल व्यवहारे, या नेत्यांच्या उपस्थितीत िपपरीमध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे अर्ज काँग्रेसने भरून त्यांना कर्जमुक्त केले. कर्ज नसलेल्या, पण आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना १० हजार रुपयांची मदत दिली.  विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील पिंपरी गावात आले होते.  प्रकृती  बिघडल्याने ते नागपूरला रवाना झाले.

राजीव सातव आणि नरेंद्र मोदी<br />अकोला बाजार येथील जाहीरसभेत खासदार राजीव सातव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाजाची, त्यांच्या भाषणातील चढउताराची नक्कल करत मोदी सरकारला धारेवर धरले. ‘मोदी की बात मन की बात नही है. यह तो मतलब की बात है’  या शब्दात मोदींच्या ‘मन की बात’ची खिल्ली उडवली.