06 July 2020

News Flash

काँग्रेसने सांगली शहराची वाट लावली – नायकवडी

महापालिकेत सत्ताधारी काँग्रेसचा केवळ खाबुगिरीचा कारभार सुरू असल्याने शहराची वाट लागली असल्याचा आरोप माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत केला.

| December 4, 2014 03:30 am

महापालिकेत सत्ताधारी काँग्रेसचा केवळ खाबुगिरीचा कारभार सुरू असल्याने शहराची वाट लागली असल्याचा आरोप माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत केला. डॉ. पतंगराव कदम यांना विचारात घेतल्याशिवाय कोणतेही धोरणात्मक निर्णय घेतले तर आमचा गट त्याला बांधील असणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मिरजेतील मुख्य ड्रेनेज वाहिनी बदलण्याची आपली भूमिका होती. मात्र महापालिकेच्या पहिल्याच महासभेत योजना बंद करण्याचा आणि पुन्हा सुरू ठेवण्याचा ठराव करण्यात आला यामागे अर्थकारण असल्याचा आरोप नायकवडी यांनी केला. यामुळे अध्र्या मिरज शहराला गॅस्ट्रोच्या साथीला तोंड द्यावे लागले. काही निरपराध रुग्ण या साथीचे बळी ठरले. याला सत्ताधारी नेतेच जबाबदार आहेत. पाणी पुरवठा यंत्रणेचे विस्तारीकरण झाले असून केवळ पंप नाहीत म्हणून दीड कोटीचा झालेला खर्च वापराविना असल्याचेही त्यांनी सांगितले.
आम्ही मिरज संघर्ष समितीच्या माध्यमातून महापालिका निवडणुकीच्या िरगणात उतरणार होतो. मात्र डॉ. कदम यांच्यामुळे काँग्रेसच्यावतीने निवडणूक लढविली. मात्र महापालिका नेतृत्व जनतेने नाकारले आहे, अशा नेतृत्वावर लोकांचा विश्वास उरलेला नाही हे विधानसभा निवडणुकीवेळी स्पष्ट झाले आहे. मर्यादित लोकांच्या हाती सत्ता एकवटली असल्याने विकास ठप्प झाला असून यापुढे निर्णय प्रक्रियेत कदम यांना सहभागी करून घेतले नाही तर आमच्या गटाला गृहित धरू नये.
 डॉ. कदम यांनी महापालिका बरखास्त करण्याबाबत केलेले वक्तव्य योग्यच असून केवळ खाबुगिरीसाठी सत्ता राबविण्याची प्रवृत्ती शहराच्या दृष्टीने अधोगतीला नेणारी आहे. शासनाकडून महापालिकेला प्राप्त झालेल्या २० कोटीच्या विशेष निधीतून मिरजेत अवघ्या १ कोटी ५० लाखाचीच कामे करण्यात आली. हा अन्याय असून कारभार अनागोंदीपणाने चालला असल्याचा आरोप त्यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2014 3:30 am

Web Title: congress ruined sangli city idris naikwadi
टॅग Congress,Sangli
Next Stories
1 जायकवाडीच्या पाण्याला पुन्हा स्थगितीच!
2 रुग्णाला २२ लाखाची भरपाई मिळणार
3 नाशिक विभागीय अंतिम फेरीत लोकांकिकांचे ‘पंचक’
Just Now!
X